27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषआंदोलन सोडा, दुर्गापूजेकडे लक्ष द्या...ममतांच्या वक्तव्यामुळे पीडितेच्या आईकडून संताप

आंदोलन सोडा, दुर्गापूजेकडे लक्ष द्या…ममतांच्या वक्तव्यामुळे पीडितेच्या आईकडून संताप

ममतांनी एका सभेत केले होते आवाहन

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका वक्तव्यावर बलात्कार पीडितेच्या आईने संताप व्यक्त केला आहे. कोलकाता येथे कार मेडिकल कॉलेजमध्ये ज्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार झाला, तिच्या आईने ममता बॅनर्जी यांच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ममता बॅनर्जी यांनी जनतेला आवाहन केले की, आता लोकांनी आंदोलनाकडून आपले लक्ष हटवावे आणि दुर्गापूजेकडे लक्ष केंद्रित करावे. त्यावर पीडितेच्या आईने संताप व्यक्त केला. सदर पीडितेचे कुटुंब हे दुःखात आहे, अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांचे हे वक्तव्य आल्यामुळे एकूणच समाजात संताप व्यक्त केला जात आहे.

पीडितेच्या आईने म्हटले आहे की, आम्ही आमच्या मुलीसोबत दुर्गा पूजा साजरी करत असू. पण आता येणाऱ्या काळात आम्ही कधीही दुर्गा पूजा करणार नाही. ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य संवेदनाहीन आहे. जर असे काही ममता यांच्या कुटुंबात घडले असते तर त्यांनी असेच वक्तव्य केले असते काय?

हे ही वाचा:

चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीची वाहनांना धडक; चालकाला अटक

इस्रायलकडून गाझामधील मानवतावादी क्षेत्रावर हवाई हल्ला; ४० जण ठार

प. बंगाल: भाजपा बूथ अध्यक्ष विजय भुईया हत्येप्रकरणी एनआयएकडून छापेमारी

दिल्लीत १ जानेवारीपर्यंत फटाके विक्री आणि खरेदीवर ‘पूर्ण बंदी’

पीडितेच्या आईने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता यांच्यावर असा आरोप केला की, आपल्या मुलीवरील अन्यायाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांना दाबण्याचा प्रयत्न ममता सरकारकडून केला जात आहे. त्या म्हणतात की, माझ्या घरातील दिवा आता विझला आहे. त्यांनी माझ्या मुलीला मारले आता तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधातील आंदोलनही ते संपवू पाहात आहेत.

९ ऑगस्टला कार मेडिकल कॉलेजमध्ये ही भयंकर घटना घडली होती. ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर हा बलात्कार झाला होता आणि नंतर तिची हत्याही करण्यात आली होती. सोमवारी ममता यांनी आवाहन केले होते की, तुम्ही आता सणसमारंभांकडे वळा. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, तो पूर्ण होऊ द्या.

पीडितेच्या कुटुंबाला पैसे देण्याचा आल्याचा आरोप ममता यांनी फेटाळला आहे. हा केंद्र सरकारचा आणि डाव्या पक्षांचा कट आहे. यासंदर्भातील पुरावे असतील तर माझे आव्हान आहे की, ते द्यावेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा