25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'या' गावात झाले पंचेचाळीस वर्षावरील सर्वांचे १००% लसीकरण

‘या’ गावात झाले पंचेचाळीस वर्षावरील सर्वांचे १००% लसीकरण

Google News Follow

Related

कोरोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी लसीकरण एकमेव शस्त्र सद्या जगासमोर उपलब्ध आहे.  हेच शास्त्र वापरत औरंगाबादच्या जानेफळ गावानं ४५ वर्षांवरील गावातील शंभर टक्के लसीकरण करून घेतले आहे. पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींचं १००% लसीकरण करणारे महाराष्ट्रातील बहुधा हे पहिलेच गाव असावं. या गावचा हा आदर्श इतरांनीही घेतला तर कोरोनाला हद्द पार करण्यासाठी नक्कीच मदत होईल.

औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील हे जानेफळ गाव. फुलंब्री खुलताबाद रोडवर १० ते १२ किमी गेल्यावर जानेफळ गाव लागतं. गावची लोकसंख्या जेमतेम  ५२५. या छोट्याशा गावांनं कोविडच्या संकटाच्या काळाला एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या गावातील ४५ वर्षावरील व्यक्तींचे १०० टक्के लसीकरण करून घेतले आहे. तेही गावात एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसतांना हे विशेष.

गावातील लोक सुरवातीला लस घेण्यासाठी  लोकांच्या मनात भीती होती. काही लोक कोरोना झालाच नाही तर लस का घ्यावी,मला काही होत नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित करत पण प्रत्येक प्रश्नच उत्तर देत गावकऱ्यांची लसीकरण बाबत एकवाक्यता झाली. गावात सुरवातीला सगळ्यांची अँटीजन टेस्ट केली आणि नंतर लसीकरण. विशेष म्हणजे लस घेण्यासाठी गावातील महिला अग्रेसर होत्या. गावातील निर्मला जाधव  आणि शशिकालाबाई खिल्लारे मोठ्या अभिमानाने सांगतात लस घेतली शेतात गेले काम केलं घर काम केलं काहीही झालं नाही आज लस घेतली तरच समाधान नाही वाटतं की कोरोना झालाच तर मला काही होणार नाही.

लसीकरणच नाही तर गावात कोरोनाचे सर्व नियम पाळले जातात. गावातील कोणताच व्यक्ती विना मास्क बाहेर घराबाहेर पडत नाही. त्यामुळे आजपर्यंत महाभयंकर ठरलेल्या कोरोनाला सुद्धा या गावात एन्ट्री करता आली नाही. गावात ४५ वर्षांवरील ८० लोक आहेत. गावकऱ्यांनी गावात एक बैठक बोलावली. त्यात लसीकरण करण्यावर एक विचार झाला. गावात सरपंच अंगणवाडी वर्कर , आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी गावात फेरी काढली. लोकांना लसीकरणाच महत्व सांगितले. गणोरी रुग्णालयायाने ही प्रतिसाद देत गावात लसीकरणाचा कॅम्प लावला.

हे ही वाचा:

१५ मे पर्यंत ‘कडक निर्बंध’ कायम

दिल्लीत एनसीटी कायदा लागू, काय आहे हा कायदा?

भारतीय कोवॅक्सिन कोविडच्या ६१७ प्रकारांवर भारी

चाचण्या वाढवा, आकडा लपवू नका- देवेंद्र फडणवीस

सरलाबाई झाल्टे अंगणवाडी सेविका घराघरात गेल्या लसीकरणाचे महत्त्व सांगितलं. स्वतः लस घेतली, लोकांना त्याचे फायदे सांगितले. मग हळूहळू लोक लस घ्यायला तयार झाले. कृष्णा गावंडे या सरपंच आणि ही लसीकरणासाठी मोठी मेहनत घेतली सुरुवातीला गावात लसीकरणाचा के मिळत नव्हता नंतर लसीकरण करण्यासाठी कॅम्प मिळाला तर गावकरी तयार नव्हते त्यांचे मनोबल वाढवले गावातील एका डॉक्टरांना गावात बोलून लसीकरणाचे महत्त्व सांगायला सांगितलं तेव्हा गावकरी तयार आज ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण झालं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा