28 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरक्राईमनामाआता 'IC814- द कंदहार हायजॅक' वर 'एएनआय' कडून खटला

आता ‘IC814- द कंदहार हायजॅक’ वर ‘एएनआय’ कडून खटला

दिल्ली उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्सकडून मागविले उत्तर

Google News Follow

Related

‘नेटफ्लिक्स’वर आलेली कंदहार विमान अपहरणाच्या घटनेवर आधारीत असलेली ‘IC814- द कंदहार हायजॅक’ ही वेबसिरीज आता आणखी एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वृत्तसंस्था ‘एएनआय’ने नेटफ्लिक्स आणि वेबसिरीज निर्मात्यांवर खटला दाखल केला आहे. वेबसिरीजमध्ये परवानगीशिवाय एएनआयचे व्हिडीओ वापरल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच वेबसिरीजचे चार भाग काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. एएनआयच्या वकिलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

‘IC814- द कंदहार हायजॅक’ ही वेबसिरीज १९९९ मध्ये काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या अपहरण झालेल्या विमानाची कहाणी सांगणारी अशी सिरीज आहे. गेल्या महिन्यात ही वेबसिरीज नेटफ्लिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेव्हाचं ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली. अपहरणकर्त्यांची नावे मुस्लिम असतानाही सिरीजमध्ये ही नावे हिंदू दाखवल्याने वादाला तोंड फुटले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सच्या अधिकाऱ्यांना नोटीस धाडली होती. नंतर पुढे एपिसोडमध्ये त्यांनी फ्रेम जोडून या वादावर पडदा टाकला होता. यानंतर आता नव्या वादाने तोंड वर काढले आहे.

या वेबसिरीजमध्ये अनेक ठिकाणी काही जुने संदर्भ दाखवण्यासाठी म्हणून जुन्या व्हिडीओ वापरण्यात आल्या आहेत. या व्हिडीओ एएनआयच्या असून त्यात त्यांचा लोगोही दिसून येत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी एएनआयचे कॉपीराईट आर्काइव्हल फुटेज परवान्याशिवाय वापरले असून एएनआय ट्रेडमार्क देखील वापरला आहे, असे एएनआयचे वकील सिद्धांत कुमार यांनी स्पष्ट केले आहे म्हणाले. नेटफ्लिक्सने सिरीजमधील चार एपिसोड काढून टाकावेत जिथे एएनआयचे व्हिडीओ वापरण्यात आला आहे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शवली असून यावर नेटफ्लिक्सचा प्रतिसाद मागवला आहे.

हे ही वाचा : 

‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अटक करा’

अमित शहांसह भाजपाचे प्रमुख नेते लालबागच्या राजाचरणी

शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन

समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून सहाय्यक महिलेचाच बलात्कार !

‘IC814- द कंदहार हायजॅक’ ही वेबसिरीज सत्य घटनेवर आधारीत आहे. २४ डिसेंबर १९९९ रोजी भारतीय प्रवाशांना काठमांडू ते दिल्ली घेऊन जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या IC814 या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. या विमानाला पाकिस्तानातील काही दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं होतं. विमानातील सशस्त्र दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेत विमानाला दिल्ली या नियोजित गंतव्याऐवजी अमृतसर, लाहोर, दुबई मार्गे अफगाणिस्तानात कंदहार येथे नेले. पुढे ओलीस प्रवाशांच्या सुटकेसाठी तत्कालीन भारत सरकारने तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. या प्रकरणावर ‘Flight Into Fear: The Captain’s Story’ हे पुस्तक पत्रकार श्रीनिजॉय चौधरी आणि अपहरण झालेल्या विमानाचे कॅप्टन देवी शरण यांनी लिहिले. या पुस्तकाच्या आधारे ‘IC814- द कंदहार हायजॅक’ ही वेबसिरीज तयार करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा