25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषमंत्री अमित शाह लालबागच्या दर्शनाला नेहमी येतात, संजय राऊत तुम्हाला थोडी...!

मंत्री अमित शाह लालबागच्या दर्शनाला नेहमी येतात, संजय राऊत तुम्हाला थोडी…!

भाजप आमदार प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

Google News Follow

Related

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री मंत्री भाजप नेते अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते पक्षातील विविध नेत्यांची भेट घेवून विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबद्दलही चर्चा करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मंत्री अमित शाह हे मौज-मजेसाठी मुंबईत येत असल्याचे राऊत म्हणाले आहेत. यावर भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका करत संजय राऊत यांना थोडी लाज वाटली पाहिजे असल्याचे म्हटले आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की,  संजय राऊतला लाज वाटली पाहिजे. खरतर आमचे नेते अमित शाह हे दरवर्षी लागबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत येतात. तसेच उद्याही ते लालबाग गणपती दर्शनाला जाणार आहेत. परंतु, मुंबईत मौज करायला अमित शाह येत आहेत, असे घृणास्पद वक्तव्य संजय राऊत यांनी केले असून त्यांनी लालबागच्या राजाचा सुद्धा अपमान केलेला आहे. उबाठा आता मतांसाठी संपूर्ण हिंदू विरोधी भूमिका घेत आहे आणि हे आता लपून राहिलेले नाही, असे प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

हे ही वाचा : 

‘गैरहिंदू, रोहिंग्या मुस्लिमांना गावबंदी’

महत्त्वाची घडामोड!! राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुतिन यांना भेटणार!

चार अधीक्षक,२ लेखा परीक्षकांसह ८ जण सीबीआयच्या तावडीत

दिव्यांग खेळाडूंनी केला भीमपराक्रम; पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके !

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा