छत्रपती शिवाजी महाराजांवरून सध्या राजकारण सुरु आहे. एकीकडे सुरतेच्या लुटीवरून तर दुसरीकडे मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच न्हवती तर आक्रमण केल होतं. मात्र, महाराजांनी सुरत लुटली असे कॉंग्रेसने आतापर्यंत शिकविल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. यावरून बराच गदारोळ झाला. याच दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचे एक वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जयंत पाटील बोलताना दिसत आहेत.
महाराष्ट्र भाजपकडून ट्वीटरवर जयंत पाटलांचा हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या घटनेचा भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आला असून माफी मागण्याची मागणी केली आहे. भाजपने ट्वीटमध्ये म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी “खंडणी” मागितली होती, जयंत पाटील. महाराजांना कधी लुटारू तर कधी खंडणी मागणारे अस म्हणत महाविकास आघाडी कोणाला खुश करू पाहत आहे. खंडणी मिळाली नाही म्हणून सुरत लुटली हे म्हणायला जीभ कशी वळली?… माफी मागा, असे भाजपकडून म्हटले आहे.
हे ही वाचा :
पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारची ‘सुवर्ण उडी’
मौलवीकडून ११ वर्षीय मुलीवर तीन महिने अत्याचार!
डीएमकेचे माजी नेते जाफर सादिक यांचा बंगला, हॉटेल, महागड्या गाड्या जप्त !
भाजपकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जयंत पाटील एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देत असल्याचे दिसत आहे. ते म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवले होते की, तुम्ही आम्हाला एवढी खंडणी द्या. ती खंडणी मिळाली नाही, तिकडून एक दूत पाठवण्यात आला होता, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्लाकरून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या दूताचा त्याच ठिकाणी शिरच्छेद झाला आणि मग त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिकडे जाऊन सुरत लुटण्याचे काम केले, असे जयंत पाटील व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. दरम्यान, जयंत पाटलांच्या वक्तव्यावर जाहीर निषेध करत भाजपने माफी मागण्याची मागणी केली आहे.
जाहीर निषेध 🏴
छत्रपती शिवाजी महाराजांनी "खंडणी" मागितली होती: जयंत पाटील
महाराजांना कधी लुटारू तर कधी खंडणी मागणारे अस म्हणत महाविकास आघाडी कोणाला खुश करू पाहत आहे.
खंडणी मिळाली नाही म्हणून सुरत लुटली हे म्हणायला जीभ कशी वळली?… माफी मागा @Jayant_R_Patil @NCPspeaks pic.twitter.com/E6f9wezAE7
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 6, 2024