राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी-एससीपी नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संभाजीनगर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३५३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा दावा केला होता. शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे ‘लाडकी बहीण’ योजनेला दिल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. तसेच गैरव्यवहार नाही, अशी एकही योजना महायुती सरकारकडे नाही. एकच व्यक्ती ३० जणींचे आधार कार्ड वापरून वेगवेगळे अर्ज भरतो. सर्व महिलांचे पैसे एकाच खात्यावर घेतो आणि सरकारला याचा मागमूसही नाही. आधार कार्ड ज्या महिलांची आहेत; त्यांना आपले आधार कार्ड त्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचलं याची कल्पना नाही आणि योजनेचा लाभही मिळालेला नाही. एक बरं झालं की भाजपच्याच माजी नगरसेवकाने हा गैरव्यवहार उघडकीस आणलाय. अन्यथा सरकारची बदनामी करायला विरोधकांनीच हे कृत्य केलंय, असा आरोप झाला असता, असे आव्हाड यांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते.
Maharashtra | Case filed against NCP-SCP leader Jitendra Awhad for allegedly misleading people by spreading false information about Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana and help to farmers. Case has been registered at Sambhajinagar MIDC Waluj Police Station u/s 353(2) of BNS.… pic.twitter.com/oSMzMzZBWh
— ANI (@ANI) September 6, 2024
हे ही वाचा :
५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!
आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश !
३०० फूट खोल दरीत कोसळून लष्कराच्या वाहनाला सिक्कीममध्ये अपघात; चार जवान हुतात्मा
दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणतीही सरकारची योजना बंद होणार नाही. निधीअभावी जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी एक लाख रुपयांची मदत बंद करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा राज्य सरकारने गुरुवारी केला होता. मदत आणि पुनर्वसन विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सविस्तर खुलासा केला होता. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.