भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप आमदार आणि रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांनी ही माहिती त्यांच्या सोशल मीडियावर दिली. भाजपच्या तिकीटावर गुजरातमधील जामनगरमधून आमदार निवडून आलेल्या रिवाबा जडेजा यांनी सोशल मीडियावर भाजप सदस्यत्व कार्डांसह स्वतःचे आणि पतीचे फोटो शेअर केले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतीच सदस्यत्व मोहीम सुरू केली होती. २ सप्टेंबर रोजी त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सदस्यत्वाचे नुतनीकरण केले होते. या सदस्यता अभियानातून भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते सदस्यत्वाचे नुतनीकरण करतील, तसेच अनेकजण पक्षात सामील होतील.
हे ही वाचा :
३०० फूट खोल दरीत कोसळून लष्कराच्या वाहनाला सिक्कीममध्ये अपघात; चार जवान हुतात्मा
कर्नाटकचा अजब शिक्षक दिन! हिजाब बंदी करणाऱ्या शिक्षकाचा पुरस्कार घेतला मागे!
युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेत भारतासह चीन, ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात
काँग्रेस, राष्ट्रवादीशपचा सांगली पॅटर्न…
दरम्यान, रिवाबा जडेजा यांनी दोघांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. # SadasyataAbhiyaan२०२४ असे कॅप्शन दिले आहे. रिवाबा जडेजा २०१९ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. २०२२ मध्ये जामनगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार करशनभाई कर्मूर यांचा पराभव करत रिवाबा जडेजा विजयी झाल्या. दरम्यान, ३५ वर्षीय रवींद्र जडेजाने भारताच्या ऐतिहासिक T२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर T२०I मधून निवृत्ती जाहीर केली होती.
🪷 #SadasyataAbhiyaan2024 pic.twitter.com/he0QhsimNK
— Rivaba Ravindrasinh Jadeja (@Rivaba4BJP) September 2, 2024