मुंबईतील दिंडोशीमधील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मालाड येथील हाजी बापू मार्गावरील गोविंद नगर येथे हा अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या २० व्या मजल्याच्या छताचा काही भाग गुरुवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास अचानक कोसळला. सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
माहितीनुसार, मालाड येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (झोपु) बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. गोविंद नगर भागात अनेक इमारतींचे बांधकाम सुरु आहे. यातील बांधकाम सुरु असलेल्या नवजीवन इमारतीचा स्लॅब गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास कोसळला. ही इमारत Gr + २० अशा स्वरुपाची आहे. या इमारतीच्या २० व्या मजल्याचे काम सुरु होते. या २० व्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना अचानक हा स्लॅब कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हे ही वाचा..
सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या विकासासाठी सहकार्य करणार
बलात्कारानंतर तेलंगणात आदिवासींचा संताप, मुस्लिमांची घरे, दुकाने पेटविली
तेलंगणात ६ नक्षलवाद्यांचा खात्मा !
‘तीनमूर्ती’ची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती
या दुर्घटनेत जखमी झालेल्या सहा जणांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढून जवळच्या एम. डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यातील चार णांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दोघांवर उपचार सुरू आहेत.