उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. अशातच एका घटनेमुळे किम जोंग हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उत्तर कोरियामध्ये सध्या भयंकर पूरस्थिती निर्माण झाली असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. शिवाय चार हजार नागरिकांचा या पुरामध्ये मृत्यू झाला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या किम जोंग यांनी कठोर पाऊल उचलले आहे. देशातील पूर परिस्थिती व्यवस्थित हाताळू न शकलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किम जोंग यांनी शिक्षा सुनावली आहे.
पुरामुळे उत्तर कोरियामधील चागांग प्रांतातील अनेक भागांचे नुकसान झाले असून यात जवळपास चार हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर किम जोंग यांनी आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू शकले नाहीत त्या सर्व व्यक्तींना शिक्षा देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर ३० वरिष्ठ अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी स्वतः किम जोंगने केली आहे. याचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. दरम्यान, काही मिडिया रिपोर्टनुसार लहान मुले, वयस्कर व्यक्ती, दिव्यांग सैनिकांसह १५ हजार ४०० लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं होतं. शिवाय उत्तर कोरियाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा..
संख्याबळाच्या आधारेच मुख्यमंत्री ठरणार!
टेक्सासमध्ये भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू
कंदाहार अपहरणावरील वेबसीरिजमध्ये दिसणार इस्लामी अतिरेक्यांची खरी नावे
…तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांनी घोषित केले आहे की, पूरग्रस्त भागांची पुनर्बांधणी करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील. नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या तीन प्रांतात जास्त नुकसान झाले आहे त्यांनी त्या तीन प्रांतांचे भाग ‘विशेष आपत्ती आपत्कालीन क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहेत. पूर येण्याची शक्यता असलेल्या देशावर जंगलतोडीचा लक्षणीय परिणाम झाला आहे आणि अशा घटनांचे परिणाम वाढले आहे असे बोलले जात आहे.