23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेष...तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !

…तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे वक्तव्य

Google News Follow

Related

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळला होता. यावरून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने हल्लाबोल होत आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा पडला नसता, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, समुद्रकिनाऱ्यावर कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी स्टेनलेस स्टीलचा वापर करणे आवश्यक आहे. स्टेनलेस स्टीलला गंज येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा पडला नसता.

ते पुढे म्हणाले,  गेल्या तीन वर्षांपासून मी किनारपट्टी भागात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी एक सस्वतःला आएल्या अनुभवाचे उदाहरण देत सांगितले, मी मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधत असताना एका व्यक्तीने मला मूर्ख बनवले. त्याने मला एक पावडर कोटिंग करून हिरव्या रंगाचे लोखंड दाखवले आणि म्हणाला यांना गंज लागणार नाही. विश्वास ठेवून मी त्याचा वापर केला, मात्र लोखंडाला गंज लागला.

हे ही वाचा : 

…तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !

आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग

कंदाहार अपहरणावरील वेबसीरिजमध्ये दिसणार इस्लामी अतिरेक्यांची खरी नावे

हिमाचलच्या सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगारच नाही; पेन्शनरही वंचित

गडकरी म्हणाले की, किनारपट्टीच्या भागापासून ३० किमीच्या परिसरात रस्ते बांधणीसाठी स्टेनलेस स्टीलचाच वापर करण्यावर पर्याय नाही, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर १०१ टक्के पुतळा पडला नसता, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार जयदीप आपटेविरोधात लुकआउट परिपत्रक जारी केले आहे. तसेच मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध निष्काळजीपणासह अन्य गुन्ह्यांची नोंद केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा