27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषविनय आपटे प्रतिष्ठानकडून शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन

विनय आपटे प्रतिष्ठानकडून शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत सादर होणार्‍या सर्व शॉर्ट फिल्म्स ‘प्लानेट मराठी’ ओटीटी चॅनेलवर दाखवण्यात येणार

Google News Follow

Related

निर्माता, दिग्दर्शक, सुप्रसिद्ध अभिनेते अशा विविध भूमिकांतून आपल्या कामाचा आणि अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे लघु चित्र (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या शॉर्ट फिल्म्सना विषयाचे कोणतेही बंधन नसणार आहे. दोन वयोगटात ही स्पर्धा घेतली जाईल तर, या स्पर्धेत सादर होणार्‍या सर्व शॉर्ट फिल्म्स या ‘प्लानेट मराठी’ या ओटीटी चॅनेल वर दाखवण्यात येतील.

प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते विनय आपटे यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लघु चित्र (शॉर्ट फिल्म) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना विषयांचे बंधन नसल्यामुळे कुठल्याही विषयावर शॉर्ट फिल्म्स पाठवता येणार आहेत. मात्र, शॉर्ट फिल्म ही जास्तीत जास्त २० मिनिटांची असावी असे बंधन आहे. ही स्पर्धा दोन वयोगटांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. एक गट २५ वर्षांखालील आणि दुसरा गट २५ वर्षांवरील असे दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत. तसेच शॉर्ट फिल्म ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पाठवता येणार आहेत. तसेच या स्पर्धेत सादर होणार्‍या सर्व शॉर्ट फिल्म्स या ‘प्लानेट मराठी’ या ओटीटी चॅनेल वर दाखवण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठविण्याची परवानगी आहे. दोन्ही गटातील सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक पुरुसोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संकलक राजन वाघधरे, जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर, ज्येष्ठ चित्रपट संकलक भक्ती मायाळू आणि प्रसिद्ध लेखिका, गीतकार रोहिणी निनावे असणार आहेत.

हे ही वाचा:

प. बंगालमध्ये बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक एकमताने मंजूर

इस्लामिक सेंटर हॅम्बर्गचा माजी प्रमुख जर्मनमधून हद्दपार

बांगलादेशात रस्त्यात घर बांधून हिंदूंची केली कोंडी !

ती सुरतेची लूट नव्हती…पंतप्रधान मोदींचे ते भाषण व्हायरल!

स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका vinayaptepratishthan@gmail.com या संकेत स्थळावर १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवायच्या आहेत. यासाठीचे प्रवेश मूल्य ५०० रुपये आहे. स्पर्धेतील दोन्ही गटात प्रत्येकी प्रथम क्रमांकाच्या शॉर्ट फिल्मला १५ हजार, द्वितीय क्रमांकाला १० हजार आणि तृतीय क्रमांकाला ७,५०० रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा