मणिपूरमध्ये हिंसाचार थांबत नाहीये. रविवारी (१ ऑगस्ट) इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कोत्रुक आणि कडंगबंद भागात सशस्त्र कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये गोळीबार झाल्याने पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेत एका ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
द प्रिंटने दिलेल्या वृतानुसार, गृह विभागाने एक निवेदन जारी करून या घटनेला, कुकी अतिरेक्यांनी ड्रोन, बॉम्ब आणि विविध अत्याधुनिक शस्त्रे वापरून नि:शस्त्र कोत्रुक गावकऱ्यांवर हल्ला केला. या घटनेत नगंगबम सुरबाला नामक महिलेचा मृत्यू झाला, ती मैतई समाजाची होती. गोळीबारादरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात तिचा मृत्यू झाला. महिलेला रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS), इम्फाळ येथे नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तसेच या हल्ल्यात मृत महिलेच्या १२ वर्षांच्या मुलीसह आणखी दोन जण जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा :
‘IC814- द कंदहार हायजॅक’ वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपविली?
पश्चिम बंगालमध्ये बलात्काराची पुन्हा घटना, संतप्त जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड !
औरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये !
टीएमसी प्रवक्त्यांना वृत्तवाहिनांवर जाण्यास मज्जाव
दुपारी २.३५ च्या सुमारास हा गोळीबार सुरू झाला, ज्यामध्ये मणिपूर पोलीस हवालदारही गंभीर जखमी झाला. वास्तविक, हा गोळीबार कांगपोकपी जिल्ह्यातील नाखुजांग गावातून सुरू होत, इम्फाळच्या पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद आणि कोत्रुक भागात वळला, संध्याकाळपर्यंत हा गोळीबार सुरू होता. दरम्यान, इंफाळ पश्चिमभागात मैतई लोकांचे वर्चस्व आहे, तर कांगपोकपीमध्ये कुकी समाजाचे लोक बहुसंख्य आहेत. सध्या केंद्रीय सुरक्षा दल आणि मणिपूर पोलिसांचे जवान घटनास्थळी पाठवण्यात आले असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.