राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआकडून आंदोलन करण्यात आले. मविआच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजपकडूनही राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले. मविआच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला केला आहे. कॉंग्रेसने शिवरायांचा कशाप्रकारे अपमान केल्याचा दाखला त्यांनी दिला, नेहरूंनी स्वतःच्या पुस्तकात शिवरायांचा केलेल्या अपमानाचाही संदर्भ त्यांनी दिला, यावर उद्धव ठाकरे कॉंग्रेसला माफी मागायला लावणार आहात का?, असा सवाल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे की, नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात जे लिहिलेले आहे, त्यासंदर्भात कॉंग्रेसला माफी मागायला लावणार का?. मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसने बुलडोजर लावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तोडला, यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुग गिळून का बसले आहेत. कर्नाटकामध्ये कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला, याबद्दल एकही शब्द बोलत नाहीत, याचे पहिले उत्तर द्या, असा हल्ला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
हे ही वाचा :
बांगलादेश: हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहेत राजीनामे !
पॅरालिम्पिक: भारतीय नेमबाजांची चमक कायम, रुबिनाने कांस्यपदक जिंकले !
हरियाणाच्या मतदान तारखेत बदल, ५ ऑक्टोबरला होणार मतदान !
धैर्य, मिहिका, ध्रुव, अनिरुद्ध, आणि रिसा फर्नांडिसची निवड
ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, हे कॉंग्रेसने आम्हाला इतिहासात शिकवलं. पण महाराजांनी सुरत लुटली न्हवती तर केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, आक्रमण केल होत. पण राजांनी सुरत कधीच लुटली न्हवती. पण हा इतिहास जणू काही महाराज सामान्य माणसांची लुट करायला त्या ठिकाणी गेले होते. अशा प्रकारचा इतिहास इतकी वर्षे कॉंग्रेसने आम्हाला शिकवला. असा इतिहास शिकवणाऱ्या कॉंग्रेसला माफी मागायला सांगणार आहात की, केवळ खुर्चीकर्ता त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात हे सांगितले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.