बांगलादेशात हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. अजूनही काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारात हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष केले जात असून त्यांना सतत दबावाचा सामना करावा लागत आहे. आता तेथील हिंदू शिक्षकांकडून बळजबरीने राजीनामे घेतले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्टपासून आतापर्यंत ५० हिंदू शिक्षकांचे राजीनामे घेतले गेले आहेत. या शिक्षकांच्या नावाची यादीही समोर आली आहे. ‘I resign…’, असे लिहून राजीनामे घेतले गेले आहे. बांगलादेशात छात्र एक्य परिषद आहे. या संघटनेत हिंदू, बौद्ध अन् इसाई लोक आहे. संघटनेने शनिवारी (३१ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत हिंदू शिक्षकांकडून राजीनामे लिहून घेतले जात असल्याचे सांगितले.
बकरगंज कॉलेजमधील प्राचार्य शुक्ला रॉय यांचा राजीनामा लिहून घेतानाचा फोटो समोर आला आहे. एका साध्या कागदावर “I resign…” इतके लिहून त्यांची सही घेतली गेली आहे. काझी नजरुल विद्यापीठाचे प्रोफेसर संजय कुमार मुखर्जी यांनी राजीनामे घेतले जात असल्याच्या वृत्ताला दुजारा देत सांगितले की, राजीनामा देण्यासाठी माझ्यावर सक्ती करण्यात आली. बांगलादेशात आम्ही खूपच असुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
पॅरालिम्पिक: भारतीय नेमबाजांची चमक कायम, रुबिनाने कांस्यपदक जिंकले !
हरियाणाच्या मतदान तारखेत बदल, ५ ऑक्टोबरला होणार मतदान !
धैर्य, मिहिका, ध्रुव, अनिरुद्ध, आणि रिसा फर्नांडिसची निवड
आरे कॉलनीत बाईक विजेच्या खांबाला धडकली; तिघे मृत्युमुखी
राजीनामे घेतलेल्या काही शिक्षकांची यादी
- सोनाली राणी दास – असिस्टंट प्रोफेसर, होली फॅमिली नर्सिंग कॉलेज
- भुवेशचंद्र रॉय – प्राचार्य, पोलिस लाईन हायस्कूल आणि कॉलेज, ठाकूरगाव
- सौमित्र शेखर – कुलगुरू, काझी नजरुल इस्लाम विद्यापीठ
- रतनकुमार मजुमदार – प्राचार्य, पुराण बाजार पदवी महाविद्यालय, चांदपूर
- डॉ. दुलाल चंद्र रॉय – संचालक, IQAC, RU
- डॉ. प्रणवकुमार पांडे – जनसंपर्क प्रशासक, अरबी
- डॉ.पुरंजित महालदार – सहाय्यक प्रॉक्टर, रबी
- डॉ. रतन कुमार – सहाय्यक प्रॉक्टर, अरबी
- डॉ.विजय कुमार देबनाथ – साथिया पायलट मॉडेल स्कूल, पबना
- गौतम चंद्र पाल – सहाय्यक शिक्षक, अजीमपूर सरकारी कन्या शाळा
- डॉ. तापसी भट्टाचार्य – प्राचार्य, अन्वर खान मॉडर्न नर्सिंग कॉलेज
- खुकी बिस्वास – प्रभारी, जेसोर कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मिडवाइफरी
- डॉ. छयनकुमार रॉय – प्राचार्य, खान साहेब कमरुद्दीन महाविद्यालय (प्रक्रिया)
- मिहिर रंजन हलदर – कुलगुरू, कुवेत
- आदर्श आदित्य मंडळ – प्राचार्य, कपोतक्ष महाविद्यालय, कोयर, खुलना
- डॉ. सत्यप्रसाद मजुमदार – कुलगुरू, BUET
- केका रॉय चौधरी – प्राचार्य, VNC
- कांचन कुमार बिस्वास – भौतिकशास्त्र शिक्षक, झेनैदह जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाविद्यालय