पॅरिस पॅरालिम्पिक्स २०२४ मध्ये भारतीय नेमबाज मनीष नरवाल याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल (SH१) स्पर्धेत रौप्य पदक जिंकत भारताच्या खात्यात अजून एका पदकाची वाढ केली आहे. नेमबाज मनीष नरवालने अंतिम फेरीत २३४.९ गुण मिळवले. पॅरिस ऑलिम्पिकचा दुसरा दिवस (३० ऑगस्ट) भारतासाठी चांगला गेला. भारतीय पॅरा ॲथलीट्सनी एका दिवसात एका सुवर्णासह एकूण ४ पदके जिंकली आहेत.
नेमबाज अवनी लेखराने सुरुवात करत चांगली महिलांच्या १० मीटर एअर रायफल (SH१) प्रकारात सुवर्णपदक जिंकले . अवनीच्या पाठोपाठ नेमबाज मोना अग्रवाल हिने देखील अचूक नेम साधला. मोनाने २२८.७ गुणांची कमाई करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. यानंतर नेमबाज मनीष नरवालने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल (SH१) स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. विशेष म्हणजे नेमबाजीत भारताला एकाच दिवशी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण तीन पदके मिळाली.
हे ही वाचा :
पश्चिम बंगालच्या शिकारीकडून मुंबईत तिघांची हत्या ?
पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मोनाची कांस्य पदकाची कमाई
आसाम विधानसभेत दोन तासांचा नमाज पठणाचा ब्रेक रद्द !
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपात सामील !
याशिवाय प्रीती पालने महिलांच्या १०० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. तिने महिलांच्या १०० मीटर T३५ स्पर्धेत कांस्यपदक पदक पटकावले. पॅरालिम्पिक गेम्सच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी प्रीती पाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. यासह भारताच्या खात्यात चार पदकांची कमाई झाली आहे.