विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार यांनी पुन्हा एकदा पत्ते पिसायला सुरूवात केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआच्या बाजूने मुस्लीमांचे एकगठ्ठा मतदान झाले. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने पवारांनी आता कंबर कसली आहे. मुस्लीमांना विधानसभेसह सर्व निवडणुकांमध्ये आरक्षण मिळायला हवे. पूर्ण संधी मिळायला हवी अशी मागणी पवारांनी केलेली आहे. मुस्लीम धार्जिण्या राजकारणामुळे या देशाची फाळणी झाली. मोहमद अली जिना यांनी मुस्लीमांचे नेतृत्व केले. आता पवारांसारखे नेते त्यांची गादी चालवताहेत.