28 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरक्राईमनामाशेख हसीना यांच्या पक्षाच्या नेत्याचा कुजलेला मृतदेह मेघालयात सापडला

शेख हसीना यांच्या पक्षाच्या नेत्याचा कुजलेला मृतदेह मेघालयात सापडला

पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारच्या हातात सूत्र आली असली तरी अजूनही अस्थिरता आहे. सत्तांतराच्या काळात बांगलादेशमध्ये हिंसा उसळली होती. आंदोलकांनी अनेक हिंदूंना आणि तत्कालीन सत्ताधारी पक्ष अवामी लीगच्या नेत्यांना यावेळी लक्ष्य केले होते. त्यांच्या घरांची जाळपोळ करत त्यांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. अशातच आता मेघालय पोलिसांना बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या भागात अवामी लीगच्या नेत्याचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

मेघालय- बांगलादेश सीमाभागात जयंतिया हिल्स जिल्हा असून या जिल्ह्यातील सुपारीच्या मळ्यात एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. हा मृतदेह अवामी लीगचे नेते इशाक अली खान पन्ना यांचा असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी भारत-बांगलादेश सीमेपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हा मृतदेह सापडला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

एसपी गिरी प्रसाद म्हणाले की, इशाक अली खान पन्ना यांची ओळख ही त्यांच्या पासपोर्टवरून झाली. इशाक अली खान पन्ना हे बांगलादेश छात्र लीगचे माजी सरचिटणीस आणि शेजारील देशातील पिरोजपूर जिल्ह्यातील अवामी लीगचे प्रमुख सदस्य होते. ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना सरकारच्या पतनानंतर फरार होते, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमधील दोन चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

गुजरातमध्ये पावसाचा हाहाःकार; पूरग्रस्त भागातून १७,८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

बंगळुरू विमानतळावर तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

आर.जी. कर दुष्कृत्य प्रकरण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया !

मृतदेह पुढील तपासासाठी खिलीहरियात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे, अशी माहिती एसपींनी बुधवारी दिली आहे. इशाक अली खान पन्ना हे बांगलादेशमधून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना हृदयविकाराचा झटका आला असावा, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा