28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरक्राईमनामारामेश्वरम कॅफे स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवादी घोरीचा भारतातील रेल्वे नेटवर्क उध्वस्त करण्याचा...

रामेश्वरम कॅफे स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवादी घोरीचा भारतातील रेल्वे नेटवर्क उध्वस्त करण्याचा मनसुबा

टेलिग्रामवर व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

Related

भारतातील बंगळूरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्लीपर सेलद्वारे पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसच्या (ISI) पाठिंब्याने स्फोट घडवून आणणारा दहशतवादी फरहातुल्ला घोरी याच्या नव्या व्हिडीओविषयी माहिती समोर आली आहे. घोरी हा व्हिडीओमधून भारतातील स्लीपर सेलला देशभरातील रेल्वे सेवांवर हल्ले करण्यास सांगत असलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. तसेच त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे की, दहशतवादी फरहातुल्ला घोरी हा सध्या पाकिस्तानमध्ये आहे.

अनेक वर्षांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असलेला दहशतवादी फरहातुल्ला घोरी हा व्हिडिओमध्ये दिसत असून भारतातील रेल्वे नेटवर्क रुळावरून घसरण्यासाठी स्लीपर सेलला कॉल करत आहे. तसेच तो प्रेशर कुकर वापरून बॉम्बस्फोट करण्याच्या विविध पद्धती समजावून सांगतो आहे. याशिवाय भारतातील पेट्रोलियम पाइपलाईन आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याच्या योजनांबद्दलही घोरी बोलतो आहे. त्याचे म्हणणे आहे की, भारत सरकार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राष्ट्रीय गुप्तचर संस्था (एनआयए) मार्फत त्यांच्या मालमत्तांना लक्ष्य करून स्लीपर सेल कमकुवत करत आहे. पण, आम्ही परत येऊ आणि सरकारला हादरवून टाकू, असं दहशतवादी घोरी व्हिडिओमध्ये बोलताना ऐकू येत आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन आठवड्यांपूर्वी हा व्हिडिओ टेलिग्रामवर प्रसिद्ध झाला होता. १ मार्च रोजी रामेश्वरम बॉम्बस्फोटात १० लोक जखमी झाले होते. एनआयएने ३ मार्च रोजी या प्रकरणाचा ताबा घेतल्यानंतर १२ एप्रिल रोजी अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब या दोन प्रमुख आरोपींना अटक केली होती. ताहा हा या स्फोटाचा मास्टरमाईंड असून शाजिबने कॅफेमध्ये आयईडी ठेवल्याचा आरोप आहे. त्यांना कोलकातामधील एका लॉजमधून अटक करण्यात आली. हे दोघे कर्नाटकातील शिवमोग्गा येथील इस्लामिक स्टेट (IS) मॉड्यूलचे कथित सदस्य आहेत. याच मॉड्यूलचा सदस्य असलेल्या शारिकने नोव्हेंबर २०२२ मध्ये मंगळुरूमध्ये स्फोट घडवून आणला होता. फरहातुल्ला घोरी आणि त्यांचा जावई शाहिद फैसल यांचे दक्षिण भारतात स्लीपर सेलचे मजबूत नेटवर्क आहे. फैसल हा रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन्ही आरोपींच्या संपर्कात होता आणि तो या प्रकरणाचा हँडलर होता.

हे ही वाचा:

दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट; मुंबई महानगर क्षेत्रात २३८ गोविंदा जखमी

मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावे कुणीतरी मागितले ५०० रुपये!

…ते भाग्य स्वप्नीलच्या वाट्याला कधी येणार?

शिवरायांच्या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे, सरकार मोठा पुतळा उभारेल !

कोण आहे फरहातुल्ला घोरी?

फरहातुल्ला घोरी, ज्याला अबू सुफियान, सरदार साहब आणि फारू या नावानेही ओळखले जाते, याचा संबंध अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांशी जोडला गेला आहे, ज्यात २००२ मध्ये गुजरातमधील अक्षरधाम मंदिर हल्ल्यात ३० हून अधिक लोक मारले गेले आणि ८० जण जखमी झाले. २००५ मध्ये हैदराबादमधील टास्क फोर्सच्या कार्यालयावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामागेही त्याचा हात होता. घोरी कथितरित्या ऑनलाइन जिहादी भरतीचे आयोजन करत आहे. पुणे – इसिस मॉड्यूलच्या अनेक दहशतवाद्यांना देशभरातून अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी घोरीचे नाव रेकॉर्डवर घेतले होते. आयएसआय भारतात स्लीपर सेल चालवत असून हल्ले करण्यासाठी तरुणांची भरती करत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी त्यावेळी केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा