28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेष'नबन्ना अभियान'; कोलकाता पोलिसांकडून २३ महिलांसह १२६ आंदोलकांना अटक!

‘नबन्ना अभियान’; कोलकाता पोलिसांकडून २३ महिलांसह १२६ आंदोलकांना अटक!

१५ पोलीस जखमी

Google News Follow

Related

प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी (२७ ऑगस्ट) राज्य सचिवालयाकडे (नबन्ना) निघालेल्या मोर्चादरम्यान कोलकाता पोलिसांनी तब्बल १२६ आंदोलकांना अटक केली आहे, ज्यामध्ये २३ महिलांसह १०३ पुरुषांचा समावेश आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, आंदोलनावेळी शहरात झालेल्या हिंसक चकमकीत १५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. नबन्नाकडे निघालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. बलात्कार-हत्येच्या निषेधार्थ आणि ममता सरकार विरोधात विद्यार्थ्यांनी ‘नबन्ना अभियान’ मोर्चाचे आयोजन केले होते.

हे ही वाचा :

लव्ह जिहादच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीला न्याय द्या!

शिवरायांच्या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे, सरकार मोठा पुतळा उभारेल !

डॉक्टर बलात्कार-हत्येप्रकरणी भाजपकडून उद्या बंगाल बंदची हाक !

मध्य प्रदेशातील पोलिस ठाण्यावर दगड फेकणारा शहजाद अली पोलिसांच्या ताब्यात !

सरकारच्या सचिवालयाच्या दिशेने ‘नबन्ना अभियान’ पदयात्रा सुरु केली. तत्पूर्वी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या, तसेच आंदोलकांवर पाण्याचा मारा करण्यात आला. संत्रागछी येथे जमा झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगड-विटा फेकल्याचीही माहिती आहे. यामध्ये पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे, तसेच पोलिसांच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याचा आंदोलकांचा दावा आहे.

दरम्यान, ‘नबन्ना अभियान’ मोर्चा आंदोलनात अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेची मागणी भाजपने केली आहे. या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी पोलीस मुख्यालय लालबाजार येथे पोलीस आयुक्तांची भेट घेवून मोर्चादरम्यान विविध ठिकाणांहून अटक केलेल्या विद्यार्थ्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा