23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणभाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी १५ उमेदवारांची यादी जाहीर

भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी १५ उमेदवारांची यादी जाहीर

जम्मू आणि काश्मीरमध्ये ९० जागांसाठी निवडणुका

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका लवकरच पार पडणार असून या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार असून प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने म्हणजेचे भाजपाने १५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत होणार आहेत. तर, ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा विशेष राज्य म्हणून असलेला दर्जा राहिलेला नाही. त्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे प्रथम ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, तासाभरातच ही यादी स्थगित करून सुधारित १५ उमेदवारांची यादी जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक सुरू असताना त्यात काही बदल करून पुन्हा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ४४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपाने पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी १५ जागांवर, दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १० जागा आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ विधानसभा जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती. राज्यात पहिल्या टप्प्यात २४ विधानसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये २४ जागांवर मतदान होणार आहे.

हे ही वाचा..

कोलकाता प्रकरण : पॉलीग्राफ चाचणीत अनेक धक्कादायक खुलासे

जम्मू काश्मीर: माजी एसएसपी मोहनलाल भगत यांचा भाजपमध्ये प्रवेश !

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बस अडवत ओळख विचारून प्रवाशांवर झाडल्या गोळ्या

युक्रेनचा रशियातील मोठ्या इमारतीवर ड्रोन हल्ला, चार जखमी !

भाजपाची पहिली यादी

  1. इंजिनिअर सय्यद शौकत गयूर अंद्राबी- पंपोर
  2. अर्शिद भट- राजपोरा
  3. जावेद अहमद कादरी- शोपियान
  4. मोहम्मद रफिक वाणी- अनंतनाग पश्चिम
  5. अधिवक्ता सय्यद वजाहत- अनंतनाग
  6. सोफी युसूफ- श्रीगुफ्वारा-बिजबेहारा
  7. वीर सराफ- शांगुस-अनंतनाग पूर्व
  8. तारिक कीन- इंदरवाल
  9. शगुन परिहार- किश्तवार
  10. सुनील शर्मा- पाडेर-नागसेनी
  11. दलीप सिंग परिहार- भदरवाह
  12. गजयसिंह राणा- दोडा
  13. शक्तीराज परिहार- दोडा पश्चिम
  14. राकेश ठाकूर- रामबन
  15. सलीम भट- बनिहाल
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा