इस्रायल आणि लेबनानमधील इराण-समर्थित संघटना हिजबुल्ला हे एकमेकांविरोधात उभे ठाकले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर रॉकेट हल्ले सुरू आहेत. इस्रायलच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लेबनॉनने उत्तर इस्रायलच्या दिशेने किमान ३२० रॉकेट्स डागले. तथापि, आयर्न डोमने लेबनीज रॉकेटला हवेतच रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. इस्रायलने केलेल्या लष्करी कारवाईत हिजबुल्लाचा कमांडर फौद शुकूर मारला गेला होता. यामुळे हिजबुल्लाहने बदला घेण्यासाठी इस्रायलवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला केल्याचे समोर आले आहे.
लेबनानमधील अतिरेकी संघटना हिजबुल्लाने इस्रायलच्या सैनिकी तळांवर क्षेपणास्त्र डागले. १०० हून अधिक क्षेपणास्त्र डागण्यात आली होती. यानंतर या रॉकेट्सला हवेतच रोखण्याचा प्रयत्न इस्रायलकडून करण्यात आला. मात्र, यानंतर इस्रायलनेही या हल्ल्याला तीव्र प्रत्युत्तर देत लेबनानवर हल्ला चढवला आहे. दरम्यान, नेतन्याहू यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट यांनी पुढील ४८ तासांसाठी संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली आहे.
इस्रायलच्या लष्कराने एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या हल्ल्याची माहिती दिली आहे. तसेच स्वसंरक्षणार्थ आम्ही हा हल्ला केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. लेबनानने आधी आमच्यावर १०० हून अधिक क्षेपणास्त्र डागले असा आरोपही इस्रायलने केला. मागच्या महिन्यात इस्रायल व्याप्त गोलान हाइट्सवर हेजबोलाने हल्ला केल्यामुळे १२ लोक ठार झाले होते. त्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात संघर्ष पेटला होता.
हे ही वाचा :
बलुचिस्तानमधील बाजारपेठेत बॉम्बस्फोट; दोन मुलांसह महिला ठार
कोलकाता : हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याच्या घरी सीबीआयचा छापा !
“मविआचे सरकार गडगडायला नाना पटोले जबाबदार”
टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव यांना अटक
इस्रायल लष्कराने सध्या लेबनानच्या दक्षिणेकडील भागाला लक्ष्य केले आहे. पण जर इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर लेबनानच्या इतर भागांवर एअर स्ट्राइक करू असा इशारा इस्रायलच्या लष्कराने दिला आहे. दरम्यान हेजबोलाने सांगितले की, आम्ही ३२० रॉकेट इस्रायलवर डागली आहेत. तसेच ११ लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. मागच्या महिन्यात बेरुत येथे हिजबुल्लाच्या कमांडरची हत्या करण्यात आली होती. या हत्येला प्रत्युत्तर देण्यासाठी हा हल्ला केल्याचे हिजाबुल्लाच्या वतीने सांगण्यात आले आहे.