31 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरराजकारणमहाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणावरील हिंदुत्ववाद्याची व्यथा!

महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणावरील हिंदुत्ववाद्याची व्यथा!

Google News Follow

Related

किरण गोरेगांवकर

गेली काही वर्षे महाराष्ट्रात राजकारणाचा जो बट्याबोळ चालू आहे हे लक्षात घेता माझ्यासारखा सामान्य नागरिक अत्यंत निराश झाला आहे.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी “शिवसेना” स्थापन केल्यापासून, एक कट्टर शिवसैनिक या नात्याने माझे वडील पांडुरंग गोरेगांवकर हे त्यांच्या हयातीत अखेरपर्यंत बाळासाहेबांच्या शिवसेनेला किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार “शिवसेना -भाजप’ युतीला मतदान करत होते. त्यांचा हाच वारसा”शिवसेना -भाजप” युती असेपर्यंत मी ही पुढे चालवला.

परंतु, बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी केवळ आणि केवळ मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेपोटी, आपले वडील बाळासाहेब यांचे विचार व मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवून “असंगाशी संग ” केला, तेव्हापासून मी “भाजप” ला मतदान केले. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते, नेते हे प्रामाणिक राहून जनतेच्या व या महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील तसेच देवेंद्रजी फडणवीस हे कुणाचाही मुलाहिजा न बाळगता “सत्य” जनतेसमोर आणतील अशी अपेक्षा होती.

जरी आम्ही “भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना ( मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)” या युतीचे समर्थक असलो, तरी आमच्या रक्तात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सळसळत असल्याने, “ठंडा करके खाओ” ही वृत्ती कमी आहे.

भारतीय जनता पक्ष, पक्षाचे शीर्षस्थ नेते तसेच देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही वर्षांत नमतेपणा स्विकारून उद्धव ठाकरे यांना मदतही केली आणि त्यांच्या अनेक “न पटणा-या” गोष्टींकडे काणाडोळा केला. काय परिणाम झाला ? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, महाराष्ट्रात “भाजपा-सेना” युतीला अपेक्षित यश मिळाले नाही याचे प्रमुख कारण म्हणजे विरोधकांनी जे नरेटीव्ह सेट केले त्यावर काऊंटर अॕटॅक करण्यात “भाजप-सेना” युती अयशस्वी ठरली असे खेदाने नमूद करावेसे वाटते.

खूप मुद्दे होते “मविआ” ला नामोहरम करण्यासाठी, वानगीदाखल मी काही उदाहरणे देतो.

१. पालघर हिंदू साधू हत्या.
२. दिशा-सुशांत प्रकरण.
३. कोरोना काळातील भ्रष्टाचार.
४. हॉटेल मालकांकडून १०० कोटी वसूली प्रकरण.
५. वाजे नेमणूक.
६. अंबानी जिलेटीन प्रकरण.
७. मनसुख हिरेन हत्या.
८. पत्राचाळ प्रकरण
९. बेहिशेबी मालमत्ता प्रकरण.
१०. डॉ. सपना पाटकर प्रकरण.
११. मा. देवेंद्र फडणवीस यांनी उजेडात आणलेले अॕड. प्रवीण चव्हाण प्रकरण.
१२. नवाब मलिक प्रकरण.

अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, पत्रकार परिषदेत जोरजोरात बोलतात व आपल्याकडे यांचे पुरावे आहेत असेही सांगतात, परंतु ” योग्य वेळ आल्यावर सादर करू” असे सांगतात.

हे ही वाचा:

“मविआचे सरकार गडगडायला नाना पटोले जबाबदार”

मध्यप्रदेश; ब्लकमेल करून अत्याचार करणाऱ्या नफीजच्या घरावर बुलडोजर !

बंद दाराआड ते चार भिंतीआड; एक सडलेला प्रवास…

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा !

ही “योग्य वेळ ” कधी येणार ? लोकसभा निवडणूक तर गेली, नुसत्या धमक्या देण्याचा हा प्रकार असाच चालू राहिला तर, सामान्य मतदाराचा विश्वास डळमळीत होऊन, विधानसभा निवडणुकीत याचा गंभीर तसेच विपरित परिणाम होण्यास वेळ लागणार नाही.

अतिचांगुलपणाही कधी कधी आपल्याच विनाशास कारणीभुत ठरतो. कलीयुग आहे हे …… ज्याला प्रेमाने दूध पाजले, त्यानेच डंख मारला आहे.

हीच वेळ आहे, हिशेब चुकते करण्याची !!!
मतदारांच्या मनात “युती” बद्दलचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर, अॕप्रोच बदललाच पाहिजे. “Attack is the best defence” हे तत्त्व अंगिकारले तरच पुढे निभाव लागेल.

“हिंदुस्थान” आणि हिंदूंच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी “आदरणीय नरेंद्र मोदी” पुढील कमीतकमी दहा वर्षे पंतप्रधानपदी राहणे अत्यावश्यक आहे व त्यासाठी प्रत्येक राज्यात “भाजपा” ताकदीने पुढे येणे ही काळाची गरज आहे.

सबळ पुरावे असतील तर, पुराव्यांनिशी पुढे येणे व विरोधकांना नामोहरम करणे यासाठी “हीच योग्य वेळ आहे”. खोट्या नरेटीव्हला ठेचून काढायचे आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करायचे असेल तर “अरे ला कारे” केलेच पाहिजे.

किरण गोरेगांवकर

(लेखक हे मुलुंडचे रहिवासी असून हौशी अभिनेते आणि शिक्षक आहेत)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा