23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाचिमुरडी पुन्हा लक्ष्य; कांदिवली समतानगरमध्ये लिंगपिसाट रहीम पठाणला अटक, मानखुर्दमध्येही अत्याचार

चिमुरडी पुन्हा लक्ष्य; कांदिवली समतानगरमध्ये लिंगपिसाट रहीम पठाणला अटक, मानखुर्दमध्येही अत्याचार

कांदिवलीतील मदरशातही झाले लैंगिक शोषण

Google News Follow

Related

बदलापूर येथील बलात्काराच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराच्या आणखी काही घटना समोर येत आहे. मानखुर्द, कांदिवली पूर्व-पश्चिम या ठिकाणी अल्पवयीन मुली आणि मुलांवर झालेल्या लैगिंक अत्याचाराच्या घटना उघडकीस आलेल्या आहे. मुंबईत घडलेल्या या तिन्ही घटनांमधील आरोपी पकडण्यात आले असून त्यात एक आरोपी हा सिरीयल रेपिस्ट असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरात घडलेल्या या तीन घटनांपैकी एक घटना चक्क ‘मदरसा’ मध्ये घडली असून त्यात दोन जणांनी एका १३ वर्षाच्या मुलांवर लैगिंक अत्याचार केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. लिंगपिसाट नराधमाकडून अल्पवयीन मुलांना लक्ष्य केले जात असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्याविरोधात २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. मात्र नंतर तो निर्णय न्यायालयाच्या निर्णयानंतर मागे घेण्यात आला. आता या घटनांबाबत महाविकास आघाडीकडून काय भूमिका घेण्यात येते याकडे लक्ष लागले आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील कांदिवली पूर्व समता नगर पोलीसानी ३१ वर्षीय रहीम पठाण याला बलात्कार आणि पोक्सोच्या गुन्ह्यात नुकतीच अटक करण्यात आली आहे. रहीम पठाण हा बेरोजगार असून त्याने ८ ऑगस्ट रोजी शेजारीच राहणाऱ्या २ वर्षाच्या चिमुरडीला मांडीवर बसवुन तिच्यावर लैगिंक चाळे करीत होता. घरात स्वयंपाक करणाऱ्या आईला मुलगी दिसली नाही म्हणून ती घराबाहेर आली, व तीचा शोध घेऊ लागली असता रहीम पठाण हा मुलीसोबत अश्लील कृत्य करताना आढळून आला. पीडित मुलीच्या आईने आरडाओरड करताच त्याने मुलीला सोडून दिले.

हे ही वाचा:

बिजनौरमध्ये हिंदू मुलाला दिली धमकी

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा !

महिलांना बुरखा घालण्यावर तालिबानच्या न्याय मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

नक्षलवाद्यांचा होणार ‘दि एंड’

दरम्यान, त्याच्या या कृत्याबाबत पतीकडे तक्रार करते असे पीडितेच्या आईने आरोपीला सुनावले असता रहीम याने पीडितेच्या आईला धमकी दिली,त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या पीडितेच्या आईने तात्काळ पोलिसात तक्रार देण्यास टाळले. तिने हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका मैत्रिणीला सांगितला असता रहीम पठाण याने यापूर्वी देखील इतर मुलीसोबत असले प्रकार केले असल्याचे सांगितले. अखेर पीडितेच्या आईने समता नगर पोलीस ठाण्यात पठाण विरुद्ध तक्रार दाखल केली, असता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून रहीम पठाण याला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी दिंडोशी येथील सत्र न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दुसऱ्या घटनेत कांदिवली पश्चिम येथील एका मदरसा मध्ये शिकत असलेल्या १३ वर्षीय विद्यार्थ्यांवर मदरसा मध्ये दोन जणांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली. पीडित मुलाची आई मुलाला भेटायला मदरसामध्ये गेली असता त्याने त्याच्यावर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराबाबत आईला सांगितले. आईने तात्काळ कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी १६ वर्षांचा असून त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. मानखुर्द येथे एका १३ वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना समोर आली आहे, १३ वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा