24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषमुंबईहून हैद्राबादला जाणारं हेलीकॉप्टर पुण्यात कोसळलं, चार जण जखमी !

मुंबईहून हैद्राबादला जाणारं हेलीकॉप्टर पुण्यात कोसळलं, चार जण जखमी !

अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट

Google News Follow

Related

गेल्या दोन आठवड्यांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने शनिवारी (२४ऑगस्ट) पहाटे पासूनच राज्यभर हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली, तर अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या. या मुसळधार पावसाचा फटका विमान वाहतुकालाही बसला. पुणे जिल्ह्यातील पौडजवळ आज सकाळी हेलीकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत पायलटसह चार जण जखमी झाले आहेत. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही.

‘एडब्लू-१३९’ असे अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचे नाव असून ते ‘ग्लोबल हेक्ट्रा’ कंपनीचे आहे. हे हेलीकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. दरम्यान, पुण्यामध्ये आल्यानंतर हेलीकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाली आणि हेलीकॉप्टर जमिनीवर कोसळलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये अपघात झालेले हेलीकॉप्टर काही वेळ घिरट्या घालत, अखेर जमिनीवर कोसळलं.

या हेलीकॉप्टरमधून चार जण प्रवास करत होते.  कॅप्टन आनंद, दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस पी राम अशी चौघांची नावे आहेत. या दुर्घटनेत चौघेही जखमी झाले. मात्र, यामध्ये कॅप्टन आनंद गंभीररित्या जखमी झाले असून उर्वरित अन्य तिघांची स्थिती स्थिर असल्याची माहिती आहे. कॅप्टन आनंद उपचाराकरिता नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

फेस्टिव्हल ऑफ डायव्हर्सिटी दरम्यान चाकू हल्ल्यात तीन ठार

आसाम सामुहिक बलात्कार: तलावात बुडून मृत्यू झालेल्या आरोपीचा मृतदेह गावात दफन करू देणार नाही

महिलांना बुरखा घालण्यावर तालिबानच्या न्याय मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

नक्षलवाद्यांचा होणार ‘दि एंड’

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा