26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामानालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

नालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

Google News Follow

Related

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळलेली असतानाचं आता नालासोपारा येथूनही आधीच धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय पीडित मुलीची मैत्रीण नालासोपार्‍यात राहते. तिला भेटण्यासाठी म्हणून पीडित तरुणी अनेकदा नालासोपार्‍याला यायची. या दरम्यान, मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडीओमध्ये काम करणार्‍या सोनू नावाच्या तरुणाची आणि तिची ओळख झाली होती. दरम्यान, गुरुवारी २५ वर्षीय सोनू या तरूणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्याच्या सांगण्यावरून पीडित तरुणी नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपीसोबत त्याचा मित्र होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला त्यांनी नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडीत मुलीने हा प्रकार घरी जाऊन आपल्या पालकांना सांगितला.

मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि पीडित मुलीची केवळ चार पाच दिवसांची ओळख होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

हे ही वाचा :

आसाम गँगरेप: मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला, तलावात उडी मारून मृत्यू

‘गब्बर’चा क्रिकेटला अलविदा!

नेपाळ बस अपघातात महाराष्ट्रातील २४ पर्यटकांचा मृत्यू; वायुसेनेच्या विमानाने मृतदेह राज्यात आणणार

भायखळ्यात घरात घुसलेल्या माथेफिरूकडून दोन मुलावर चाकू हल्ला

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका १० वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. हे कुटुंबीय काही कामानिमित्त वल्लभनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते. त्यानंतर मुलीला नातेवाईकांकडे ठेवून ते बाहेर गेले आणि तेव्हाच फायदा घेत या मुलीच्या दूरच्या नातेवाईक असलेल्या यश गवईने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. दरम्यान, घडलेला सर्व प्रकार या चिमुकलीने आई-वडिलांना सांगितला त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा