31 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरक्राईमनामाबदलापूर अत्याचार प्रकरण: संतप्त ग्रामस्थांकडून अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड

बदलापूर अत्याचार प्रकरण: संतप्त ग्रामस्थांकडून अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड

अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक

Google News Follow

Related

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर येताच राज्याभर संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेकही पाहायला मिळाला. बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती तर रेल रोकोही करण्यात आला. या प्रकरणी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. अशातच आता संतप्त नागरिकांनी आरोपी अक्षय शिंदे याच्या घराची तोडफोड केल्याचे समोर आले आहे.

चार वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्याविरोधात बदलापूरसह राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, बुधवारी बदलापूरमध्ये अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यांनी अक्षय शिंदे याच्या घराची तोडफोड केली आहे.

अक्षय शिंदे खरवई गावापासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो. ग्रामस्थांनी बुधवारी त्याच्या घरात शिरत कुटुंबीयांना बाहेर काढले आणि घरातील सामानाची तोडफोड केली. यानंतर गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हुसकावून लावत गाव सोडण्यास भाग पाडले. अक्षय शिंदे याचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे. अक्षयचा जन्म खरवई गावात झाला होता. तो याठिकाणी असणाऱ्या एका चाळीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ असे तिघेजण आहेत. तो दहावीपर्यंत शिकला असून यापूर्वी तो एका इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्यानंतर १ ऑगस्टपासून तो बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता.

हे ही वाचा :

आंध्र प्रदेशमधील फार्मा कंपनीत स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाखांची मदत

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर आंदोलनात कसे काय झळकले?

सावधान… राजकीय गिधाडे सरसावली बलात्काराच्या वणव्यात हात शेकण्यासाठी!

युवराज सिंगचा क्रिकेट प्रवास मोठ्या पडद्यावर

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये मंगळवारी नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. याशिवाय पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र स्वीकारायला कल्याणमधील वकिलांच्या संघटनेन नकार दिला आहे. अक्षय शिंदे याच्यासारखे नराधम कधीच तुरुंगाबाहेर येऊ नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचे वकिलांच्या संघटनेने सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा