पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (२१ ऑगस्ट) सकाळी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पोलंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटकरत याची माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांना भेटण्यास उत्सुक आहे. पोलंडमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय समुदायातील लोकांनाही भेटणार आहे. पोलंड दौऱ्यानंतर मी युक्रेनला भेट देईन आणि राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेईन, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
विशेष म्हणजे गेल्या ४५ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट आहे. पोलंडसोबतच्या राजनैतिक संबंधांच्या ७० वर्षांच्या स्मरणार्थ पंतप्रधानांचा हा दौरा होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलंड हा मध्य युरोपमधील भारताचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे.
हे ही वाचा :
हिंदूंच्या संरक्षाणासाठी चारही शंकराचार्य सरसावले !
बांगलादेशातील महिला वर्ल्डकप आता दुबईत
बांगलादेशात हिंदुंवरील अत्याचार थांबता थांबेना !
बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित !
पंतपधान मोदी पोलंडहून युक्रेनची राजधानी कीव येथे जाणार आहेत. भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच युक्रेन भेट आहे. युक्रेनसोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबाबत झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पीएम मोदींनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले आहे. युक्रेनमध्ये लवकरच शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, अशी आम्हाला आशा आहे, असेही ते म्हणाले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटकरत म्हटले की, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून मी युक्रेनला भेट देत आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.