आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण. महायुतीने राज्यातील लाडक्या बहीणींसाठी जाहीर केलेल्या योजेनेचा लाभ आजवर सुमारे एक कोटी महीलांना मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राज्यभरात दौरे करतायत. लाडक्या बहीणींचे आशीर्वाद घेतायत. महीला वर्गाचा महायुतीकडे झुकलेला पाहून विरोधी पक्षातील नेते बिथरलेले दिसतात. मविआतील नेत्यांची विधाने ऐकली तर याची कल्पना येऊ शकेल. सरकारची योजना आपले लेबल लावून महीलांपर्यंत पोहचवायची, श्रेय लाटायचे आणि योजनेला विरोधही करायचा अशी दुहेरी रणनीती विरोधक वापरत आहेत.