चांदिवलीतील संघर्ष नगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या कट्टरपंथीय युवकाने ३ वर्षाच्या दलित कन्येवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रविवार (१८ ऑगस्ट ) पीडित कुटुंबांची भेट घेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला, त्याच्या कृत्याची त्वरित शिक्षा मिळावी तसेच त्यावर अनुसूचीत जातीच्या मुलीचे शोषण केल्याबद्दल सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी पीडितेच्या आईने यावेळी केली. मंत्री लोढा यांनी या मागणीला अनुसरून प्रशासनाला त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कट्टरपंथीय युवकावर रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरु आहे.
मंत्री लोढा म्हणाले की, महिलांची सुरक्षा ही प्रशासनाची, सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याच गुन्हेगाराची हयगय केली जाणार नाही. समाजघातकी प्रवृत्तींना आपण एकत्र येऊन रोखायला हवे आणि त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हा राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे येथे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा. तसे न करणाऱ्या गुन्हेगारांना आणि त्यांना पाठीशी घालण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या गुंडांना माफी नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी स्थानिकांच्या सूचना सुद्धा मी आज ऐकल्या असून, त्या अनुषंगाने सुद्धा लवकरच पालकमंत्री या नात्याने मी उपाययोजना करीन, असे मंत्री लोढा म्हणाले.
हे ही वाचा :
लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?
ममता बॅनर्जींची ठोकशाही, विरोधात पोस्ट करणाऱ्या विद्यार्थीनीला अटक !
कोलकाता बलात्कारित तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून आले भयानक सत्य समोर
रक्षाबंधन सणाच्या गोष्टीवरून सुधा मूर्ती ट्रोल
दरम्यान, या युवकाने निघृण अत्याचार करताना पीडितेच्या भावाने काही बघू नये, यासाठी त्याच्या डोळ्यात बोटे घातली आणि त्यास जखमी केले होते. पीडित कन्या आणि तिचा भाऊ या दोघांवर सुद्धा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती हळूहळू स्थिर होत आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर या विरुद्ध आवाज उचलल्यास युवकाच्या आई वडिलांनी पिडीतेच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली. चांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कट्टरपंथीयांद्वारे इतर धर्मीय महिलांना त्रास देण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. या गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील झाला आहे.