25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाविमानातून ज्वलनशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशासह पाच जणांना बेड्या

विमानातून ज्वलनशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशासह पाच जणांना बेड्या

Google News Follow

Related

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विदेशात ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ३२ वर्षीय प्रवाशासह पाच जणांना सहार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समीर बिश्वास, नविन शर्मा, बिश्वुभाई उर्फ विश्वनाथ सेंगुतर, नंदन यादव आणि अखिलेश यादव अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मुंबई विमानतळावरील टर्मिनल-२ येथे हा प्रकार उघडकीस आला. इथोपियन एअरलाईन्सच्या विमानाने मुंबई ते अदिस अबाबा असा प्रवास करत असलेल्या प्रवासी विश्वास याने त्याच्या प्रवाशी बॅगमधून ज्वलनशील पदार्थ आणला होता. त्याच्या बॅगमधून धूर येऊ लागल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली आणि सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.

काही क्षणातच बिश्वास याच्या बॅगने पेट घेतला. येथील सुरक्षा यंत्रणेने तातडीने पावले उचलत आग विझवली. घटनेची माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिश्वासला ताब्यात घेत त्याच्या चौकशीतून आणखी चौघांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी गुन्हेगारी कट रचून ज्वलनशील पदार्थांच्या वाहतूकीने प्रवाशी विमान नष्ट किंवा असुरक्षीत होवू शकते याची जाणिव असताना देखील ज्वलनशील पदार्थ विमानतुन वाहतुक करण्याचा निर्णय घेतला.

आरोपींनी इथोपियन एअरलाईन्सच्या प्रवाशी विमानातील प्रवाशांचे जीवन आणि व्यक्तीगत सुरक्षितता तसेच, विमानतळ परिसर धोक्यात आणणारे कृत्य केल्याचे उघड झाले. अखेर, सहार पोलिसांनी इथोपियन एअरलाईन्सचे व्यवस्थापक राकेश वाकळे यांची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हे ही वाचा:

चौधरी झुल्फिकार अली यांचा भाजपात प्रवेश !

मनोज जरांगेंच्या रॅलीत ५ लाख नव्हेत ८ हजार लोक !

मुंबई विमानतळावरून ४ कोटी ८३ लाखांचे कोकेन जप्त !

मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचा राऊतांना पाठींबा असेल का?

मूळचा पश्चिम बंगालमधील नदीया, ताहीतूरचा रहिवासी असलेला समीर बिस्वास हा प्रवासी म्हणून ज्वलनशील पदार्थ विमानतुन वाहतुक करणार होता. त्याने दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात असलेल्या यातील पाहिजे आरोपी नवीन शर्मा याच्याकडे नोकरीला जाणार होतो. त्यानेच ही बॅग आणण्यास सांगितली होती, असा दावा केला आहे.

अंधेरी पूर्वेकडील मारोळ नाका येथील रहिवासी नंदन यादव (२६) याने आरोपी अखिलेश यादव (२८) याच्या मदतीने बिस्वास याला विमानतळाबाहेर ज्वलनशील पदार्थ आणून दिला होता. तर, दिंडोशीतील रहिवासी आरोपी सुरेश सिंग (४६) याचा सहार कार्गो ए. एस. लॉजीस्टीकचा व्यवसाय आहे.

सिंग याने अंबरनाथमधील रहिवासी अटक आरोपी विश्वनाथ सेंजुनधर (३७) आणि कांगो येथील पाहिजे आरोपी नवीन शर्मा यांचे मदतीने ज्वलनशील पदार्थ प्रवाशी आरोपी बिश्वासकडे देण्यासाठी आरोपी नंदन यादवकडे दिल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी ज्वलनशील पदार्थांचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याचे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा