पश्चिम बंगाल पोलिसांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरच्या बलात्कार-हत्याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केल्याबद्दल एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. साग्निक लाहा (वय २३) असे त्याचे नाव आहे.
साग्निक लाह हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात या पोस्टमध्ये अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा..
ओमर अब्दुल्ला म्हणतात, ‘निवडणुकीनंतर आम्ही कलम ३७० रद्द करण्याचा ठराव मांडू’
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणः सोशल मीडियावरून पीडितेचे नाव, फोटो, ओळख हटवण्याची मागणी !
कोलकत्ता बलात्कार चौकशीबद्दल तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद
मुंबई विमानतळावरून ४ कोटी ८३ लाखांचे कोकेन जप्त !
ही पोस्ट केल्यानंतर काही वेळातच या तरुणाला टीएमसी समर्थकांनी बेदम मारहाण केली आहे. अखेरीस साग्निक लाहाच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर शुक्रवारी रात्री अलीपुरद्वार जंक्शन येथून अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वकील दीपशिका रॉय यांच्या म्हणण्यानुसार, लाहा यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७९, २९४ आणि २९६ ए आणि माहिती तंत्रज्ञानाच्या ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवस्वांची कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये एक जामीनपात्र तर एक अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे तो ३१ ऑगस्टपर्यंत कोठडीत असेल, असे रॉय यांनी सांगितले आहे.