25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाअटल सेतूवरून उडी मारू पाहणाऱ्या महिलेला पोलिसांनी, कारचालकाने वाचवले!, थरारक व्हीडिओ व्हायरल

अटल सेतूवरून उडी मारू पाहणाऱ्या महिलेला पोलिसांनी, कारचालकाने वाचवले!, थरारक व्हीडिओ व्हायरल

पोलिसांनी जीव धोक्यात घालून महिलेला वाचवले, सगळीकडे कौतुक

Google News Follow

Related

तत्परतेने काम करणे हे मुंबई पोलिसांचे वैशिष्टय मानले जाते. अटल सेतूवरून पाण्यात उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला पोलिसांनी १६ ऑगस्टच्या संध्याकाळी वाचवले. त्यामुळे मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ट्विट करून या पोलिसांचे कौतुक केले आहे तसेच अशा प्रकारे आत्महत्या करणे योग्य नाही, आपल्या कुटुंबियांचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सदर घटनेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ट्विट केलेल्या व्हीडिओत अटल सेतूवर उभ्या असलेल्या एका कॅबमधील सदर महिला ही पुलाचा कठडा ओलांडून उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. पण त्या कॅबचा चालक त्या महिलेला ते करण्यापासून परावृत्त करतानाही दिसतो आहे. तेवढ्यात मुंबई ट्रॅफिक कंट्रोलची गाडी तिथे वेगाने येते आणि त्यातून पोलिस उतरताना दिसतात. ते ताबडतोब कठड्यावर चढत असताना ती महिला झोकून देते तेव्हा सदर चालक त्या महिलेचा हात, तिचे केस पकडतो. तेव्हाच पोलिसही कठड्यावर चढून तिला पकडतात आणि तिला वर आणतात.

हे ही वाचा:

नाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक

‘पक्ष मागितला असता तर दिला असता, वर काय घेऊन जायचं आहे?’

खेडगल्लीचा विघ्नहर्ता नाबाद ७५

रुळावरील वस्तूमुळे साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले

१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून ६ मिनिटांच्या सुमारास अटल सेतूवरून नावाशेवा वाहतूक शाखा पेट्रोलिंग वन वर कॉल आला अटल सेतू ब्रिज मुंबईकडून शेलगर टोल नाक्या कडे जाणाऱ्या लेनवर स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 02 FX1686 ही रस्त्यात थांबली असून कार मधील एक महिला ब्रिजच्या रेलिंग क्रॉस करून काहीतरी करीत आहे . त्यावरून पेट्रोलिंग १ वाहनावर वर असलेले पोलीस नाईक ललित शिरसाठ, पोलीस नाईक किरण म्हात्रे, पोलीस शिपाई यश सोनवणे 4) पोलीस शिपाई मयूर पाटील हे सदर ठिकाणी पोहोचले. सदर महिला रीमा मुकेश पटेल वय ५६ वर्ष या मुलुंडमध्ये राहणाऱ्या महिला उडी मारण्याच्या स्थितीत होत्या. तेव्हा वरील पोलीस अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करीत तिला सुरक्षित वर काढले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा