27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषआंदोलनामुळे ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे नुकसान झाले!

आंदोलनामुळे ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे नुकसान झाले!

कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांचा दावा

Google News Follow

Related

भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहा पदके तरी मिळाली असती अशी खंत व्यक्त करतानाच कुस्तीगीरांच्या आंदोलनाचा फटका भारताच्या कामगिरीला बसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे.

भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतून अवघे एकच पदक जिंकता आले. अमन सहरावतने ब्राँझ पदक जिंकले. ते पुरुष गटातील आणि एकूणच कुस्ती पथकातील एकमेव पदक ठरले. भारताला विनेश फोगाटकडून सुवर्ण किंवा रौप्यपदकाची अपेक्षा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही. तिचे १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने तिला अंतिम फेरी खेळण्यापासून परावृत्त करण्यात आले आणि भारताची ती पदक जिंकण्याची व इतिहास घडविण्याची संधी हुकली. विनेशबाबतच्या त्या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली. हे प्रकरण क्रीडा लवादापर्यंत गेले होते. त्यांनीही विनेशला रौप्यपदक देता येणार नाही, असे स्पष्ट केले.

संजय सिंह यांना जेव्हा कुस्तीच्या एकूण कामगिरीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, २०२३मध्ये कुस्तीगीरांनी जे आंदोलन केले त्यामुळे कुस्तीवर त्याचा विपरित परिणाम झाला. नाहीतर आपण सहा पदके नक्कीच जिंकू शकलो असतो. जवळपास १५-१६ महिने कुस्तीला या आंदोलनाचा फटका बसत होता. त्यामुळेच आपल्या हातून पदके निसटली.

हे ही वाचा:

कलम ३७० रद्दनंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच होणार विधानसभा निवडणुका

आंदोलनामुळे ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे नुकसान झाले!

समान नागरी कायदा, मोदींनी लाल किल्ल्यावरून शड्डू ठोकले…

‘लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात

विनेशच्या अपात्रतेबाबतही संजय सिंह यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, वजन व्यवस्थित ठेवणे ही कुस्तीगीराची वैयक्तिक जबाबदारी असते. तरीही तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती.

संजय सिंह यांनी क्रीडा लवादाकडूनही अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांच्याकडून न्याय मिळाला तर आणखी एक पदक भारताच्या खात्यात जमा होईल, असे ते म्हणाले होते.

विनेशला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तिला हंगेरी येथे परदेशी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास पाठविले होते. शिवाय, वजन नियंत्रित करणे ही खेळाडूचीच जबाबदारी असते. कोणत्या वजनी गटात खेळायचे हादेखील खेळाडूचा स्वतःचा निर्णय असतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा