25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषनाझिया खान यांनी शिवम दुबेच्या पत्नीला केला सवाल, तुमचा विवाह मुल्ला-मौलवींना मान्य...

नाझिया खान यांनी शिवम दुबेच्या पत्नीला केला सवाल, तुमचा विवाह मुल्ला-मौलवींना मान्य आहे काय?

Google News Follow

Related

मुंबईचा क्रिकेटपटू शिवम दुबे याची पत्नी अंजुम खान हिने भाजपा प्रवक्ता नाझिया खान हिच्यावर अपमानास्पद विधान केल्यानंतर नाझिया खान यांनीही तिला आव्हान दिले आहे.

अंजुम खानने नाझिया खान ही इस्लामचा अपमान करत असल्याचे म्हणत लोकांना भडकावले आहे. मोहम्मद पैगंबरांबाबत नाझियाने अपमानजनक विधान केले आहे, असे म्हणत अंजुम खानने तिच्याविरोधात पोस्ट लिहिली. जर तुम्हाला नाझियाच्या या विधानांमुळे राग येत नसेल तर तुमचा धर्म मेला आहे. तसे नसेल तर नाझिया खानला अटक करण्याच्या माझ्या मागणीला पाठिंबा द्या. अंजुम खानने नाझियाचा फोटो टाकून त्यावर बहिष्कार असे लिहिले आहे. नाझिया खानविरोधात पाऊल टाकण्याची हीच वेळ आहे. अब समय आ गया है नाझिया की खबर लेने का, मुसलमानो के खिलाफ बोलते बोलते ये अभी हमारे आका के खिलाफ बात कर रही है

 

याआधी भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या टिप्पणीनंतर त्यांचे समर्थन केल्याबद्दल राजस्थानातील कन्हैयालाल याला ठार मारण्यात आले होते.

हे ही वाचा:

कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

शेख हसिनांसाठी बांगलादेशात तुरुंग सज्ज?

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी पतंजलीचा माफीनामा न्यायालयाने केला मान्य

त्यावर नाझिया यांनी व्हीडिओ करत याला रोखठोक उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अंजुम खानने शिवम दुबे याच्याशी विवाह केला असला तरी मुल्ला मौलवीना तो मान्य आहे का?  तुझ्या मुलांना ते औरस मानायला तयार आहेत का? शिवम दुबेने कलमा पढला आहे का, जर नसेल आणि तो हिंदू असेल तर इस्लामनुसार तुमची मुले अनौरस मानली जातील. मग मदनी, रशिदी, तौकीर यांना विचारा की. तू तर शिकली सवरलेली आहेस मग कधी हिजाबमध्ये दिसते, कधी मोकळेढाकळे कपडे घालतेस सरड्याप्रमाणे रंग का बदलतेस मग? मी तुला अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा