23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषभारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अहिल्या भवन’ मानखुर्दमध्ये उभे राहणार!

भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अहिल्या भवन’ मानखुर्दमध्ये उभे राहणार!

कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्या भवन’ मानखुर्द येथे उभारले जाणार आहे. कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज (१३ ऑगस्ट ) घोषणा केली. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून अहिल्या भवन उभारण्यात येणार असून, त्यासाठी ४७ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणार आहे. या अहिल्या भवनामध्ये मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने चेंबूर येथील फाईन आर्ट्स सोसायटी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत घोषणा केली.

पत्रकारांशी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “आज भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन उभारले जाणार आहे. महिला आणि बालकांच्या विकासासाठी शासनाची कटिबद्धता दर्शवणारे हे भवन फक्त राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श ठरेल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे. त्यांची शिकवण जपण्यासाठी, त्यांच्या कार्याला आदरांजली देण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे कार्य केले जाईल हा विश्वास आहे.”

येथे संकटात अडकलेल्या, हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक व कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्रांच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या इमारतीत कार्यरत होईल. याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच महिलांना विविध कायदे, योजना व विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी २०० व्यक्तींची क्षमता असलेले अद्ययावत ऑडिटोरियम या संकुलात उभे राहणार आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत हक्काचे विश्रामगृह या संकुलात उभारण्यात येणार आहे. याशिवाय महिला व बालकांच्या विविध विकासात्मक चळवळीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील या विश्रामगृहाचा लाभ घेता येणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

या अहिल्या भवनाच्या परिसरात मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले खालील कार्यालये
१. बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांचे एकूण २० कार्यालये या इमारतीत असतील. सद्यस्थितीत यातील बहुतांश कार्यालये मुंबईत भाड्याच्या इमारतीत आहेत.
२. महिला आयोगाचे मुंबई विभागीय कार्यालय
३. बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचे कार्यालय
४. बालकल्याण समिती : मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेता, या जिल्ह्यात २ बालकल्याण समिती कार्यरत आहेत. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या बाबतीत या समितीला निर्णय घेण्याचे न्यायिक अधिकार असतात. त्यांचे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेले दोन स्वतंत्र कार्यालये या इमारतीत असतील.
५. बाल न्याय मंडळ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांच्या वाढत्या गुन्ह्यांमधील समावेशाचे प्रमाण लक्षात घेता या जिल्ह्यात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या दोन बालन्याय मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या इमारतीत या दोन्ही बालन्याय मंडळांसाठी अद्ययावत सुसज्ज असे कार्यालये असतील
६. महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे मुंबई जिल्ह्याचे कार्यालय : बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ यशस्वीपणे राबविणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय या इमारतीत असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा