23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषशेख हसिनांसाठी बांगलादेशात तुरुंग सज्ज?

शेख हसिनांसाठी बांगलादेशात तुरुंग सज्ज?

हसीना यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

Google News Follow

Related

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढाका येथे १९ जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अबू सईदच्या मृत्यूप्रकरणी शेख हसीना आणि इतर सहा जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. शेख हसीना बांगलादेशात परत आल्यास त्यांना उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागू शकते, असे मानले जात आहे. १९ जुलै रोजी ढाका येथील मोहम्मदपूर भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किराणा दुकानाचा मालक अबू सईद ठार झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख हसीना यांच्यासह अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादर, माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान कमाल, माजी पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून, माजी डीबी प्रमुख हारुण, माजी डीएमपी सहआयुक्त बिप्लब कुमार आणि माजी डीएमपी आयुक्त हबीबुर रेहमान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मदपूरचे रहिवासी अमीर हमजा शातील यांनी शेख हसीना आणि इतरांविरुद्ध ढाका महानगर दंडाधिकारी राजेश चौधरी यांच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. यात आश्चर्यकारक बाब म्हणजे गुन्हा दाखल करणारी व्यक्ती मृत व्यक्तीची नातेवाईक नाही. देशाचा एक जबाबदार नागरिक असल्याने आणि मृत व्यक्तींप्रती सहानुभूती असल्याने त्यांनी हा खटला दाखल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंशी पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी साधणार संवाद !

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लोगोत शिवरायांची प्रतिमा !

नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १ हजार ९५० कामांना मंजुरी

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

दरम्यान, १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता अबू सईद मारला गेल्याचे हमजाने आपल्या तक्रारीत लिहिले आहे. पंतप्रधान शेख हसीना, गृहमंत्री आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिस गोळीबार झाला, त्यामुळे सर्वांवर खुनाचा आरोप आहे. तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून आदेश देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा