भारताचा टोकियो २०२० पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत हा पॅरिस २०२४ पॅरालिम्पिकला मुकणार आहे. प्रमोद भगत याला डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याने १८ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) जाहीर केले आहे की, भारताचा टोकियो २०२० पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत याला डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १८ महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. भगतने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL3 प्रकारात अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते.
प्रमोदने १२ महिन्यांत तीनवेळा डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे १ मार्च २०२४ रोजी उघड झाले होते. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्टच्या निर्णयाला प्रमोदने आव्हान दिले होते. २९ जुलैला प्रमोदचे अपिल फेटाळण्यात आले. तसेच १ मार्च २०२४ च्या CAS अँटी-डोपिंग विभागाच्या निर्णय कायम ठेवण्यात आला.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नऊ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम नागपूरच्या संत्र्यांवर? निर्यात रखडली
… म्हणून मुनव्वर फारुकीने मराठी माणसाची मागितली माफी!
भारतीय मार्केटवर हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम ‘फुस्स’
प्रमोद भगतने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. अंतिम फेरीत त्याने ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलवर २१-१४, २१-१७ असा विजय मिळविला होता. बिहार येथील वैशाली गावात प्रमोद याचा जन्म झाला. पाच वर्षांचा असताना त्याच्या डाव्या पायाची वाढ खुंटली होती. १३ वर्षांचा असताना तो एकदा बॅडमिंटन सामना पाहायला गेला आणि त्याला या खेळाची भुरळ पडली. पुढील दोन वर्ष त्यानं फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले. १५ वर्षांचा असताना त्याने पहिली स्पर्धा खेळली.