बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन होऊनही हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. तिथे हिंदूंना टार्गेट करून सातत्याने हल्ले केले जात आहेत, ज्याचा जगभरातून निषेधही होत आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या संदर्भात आता ५० हून अधिक नामवंत लेखक आणि वकिलांनी भारत सरकारला एक पत्र लिहिले आहे, ज्याद्वारे त्यांनी अशा घटना थांबविण्याची मागणी केली आहे. भारतीय संसदेला या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या पत्रात केले आहे. वास्तविक, हे पत्र लिहिणाऱ्या लेखकांचा उद्देश हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्याचा आहे. दरम्यान, बांगलादेशातील परिस्थिती सध्या खूपच वाईट आहे, तिथे हिंदूंना मारहाण केली जात आहे, मंदिरे पाडली जात आहेत.
लेखक आणि वकिलांनी आपली पत्रात बांगलादेशातील हिंदूंवरील होत असल्याच्या घटनांचा उल्लेख केला. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले की, अलीकडच्या काळात इस्कॉन सेंटर आणि देशातील इतर भागात अनेक मंदिरे जाळण्यात आली. त्यांची तोडफोड करण्यात आली. त्याचे काही व्हिडिओही व्हायरल झाले होते. अनेक व्हिडिओंमध्ये दंगेखोर हिंदूंना मारहाण करताना दिसत आहेत. बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात अनेक दिवसांपासून कट रचले जात आहेत, तेथे सातत्याने हल्ले होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये लेखक अमिश त्रिपाठी, आनंद रंगनाथन आणि वकील जे साई दीपक यांसारख्या लोकांचा समावेश आहे. दरम्यान, बांग्लादेशमधून नुकताच एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एका हिंदू व्यक्तीला खांबाला लटकावून मारहाण करून त्याची हत्या केल्याचे समोर आले होते.
हे ही वाचा :
युपीत तीन महाविद्यालयीन मुलींनी मुद्दाम घातला हिजाब
‘आम्ही तुम्हाला आत घेऊ शकत नाही…’, बांगलादेश सीमेवरील लोकांना बीएसएफ जवानाचे उत्तर
पोलिसांना सापडला ‘मोरावर चोर’, तेलंगणातील यूट्युबरला अटक !
२५ लाख हिंदूंची कत्तल
दरम्यान, १९७१ मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी हिंदू समाजावर सर्वाधिक अत्याचार केले. त्यांनी सुमारे २५ लाख हिंदूंची कत्तल केली होती. २०१३ पासून आतापर्यंत हिंदूंवर ३६०० हून अधिक हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत, मात्र अजूनही कारवाई होत नाही. तेथील लष्कराने सांगितले की, अल्पसंख्याकांचे रक्षण केले जाईल, परंतु परिस्थिती उलट आहे.