29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरक्राईमनामाउरण हत्याकांड प्रकरणात आणखी खुलासे होणार? यशश्रीचा मोबाईल पोलिसांच्या हाती

उरण हत्याकांड प्रकरणात आणखी खुलासे होणार? यशश्रीचा मोबाईल पोलिसांच्या हाती

यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाईल गहाळ झाला होता

Google News Follow

Related

उरणमधील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर उरणसह राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली होती. अशातच आता या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाईल गहाळ झाला होता. अखेर तो मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून आता या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

उरणमधील तरुणी यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक येथून अटक केली. अटक केल्यानंतर आरोपी दाऊद शेखवर पोलिसांकडून अॅट्रॉसिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून यशश्री आणि आपल्यात मोबाईलवरुन संपर्क होता, अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखने दिली होती. मात्र, यशश्रीचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यामुळे पोलिसांकडे दाऊदनं कबुली दिल्यानंतरही पुरावा नव्हता. मात्र, आता यशश्रीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणं सोपं होणार आहे. तसेच, गहाळ झालेला मोबाईल सापडल्यामुळे या प्रकरणी आता आणखी खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी मोबाईलमधील डाटा मिळवण्यासाठी फोन लॅबकडे पाठवला आहे.

हे ही वाचा..

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रद्दच करा!

‘माझ्या नादाला लागू नका’, माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे कळणार नाही !

मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगेसोयऱ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ‘ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ पुरस्काराने सन्मानित !

उरण येथे राहणारी यशश्री शिंदे ही कॉर्मसमधून पदवीधर असलेली यशश्री एका खासगी कंपनीत नोकरीला होती. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत, असं तिने तिच्या पालकांना सांगितलं. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही, त्यावेळी तिच्या वडिलांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पुढे शुक्रवारी रात्री उरण पोलिसांना कोटनाका परिसरात एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. यशश्रीच्या पालकांनी कपड्यांवरुन आणि तिच्या शरीरावरील टॅटूमुळे मृतदेह तिचाच असल्याची ओळख पटवली. मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे दाऊद शेखवर संशय व्यक्त केला होता. यावरून पोलिसांनी कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा