27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरसंपादकीयपरमबीर यांचा पर्दाफाश करण्याची देशमुखांना संधी...

परमबीर यांचा पर्दाफाश करण्याची देशमुखांना संधी…

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या तापलेल्या राजकारणात आणखी जाळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी मला ऑफर दिली होती असा दावा केला. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे फडणवीसांचे बाहुले आहे, असाही त्यांनी आरोप केला. इथे प्रश्न हा निर्माण होतो की भाजपा नेत्याच्या बाहुल्याला मविआने पोलिस आयुक्तपदी बसवले का? आता परमबीर यांनी उत्तर द्यायला सुरूवात केल्यामुळे मविआची आणखी काही लफडी बाहरे येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. देशमुख बहुधा विसरले की कांच के घर मे रहनेवाले दुसरों पर पत्थर नही फेकते.

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम यांच्या मार्फत मला ऑफर दिली होती. ठाकरे पिता पुत्र, अनिल परब, अजित पवार यांना अडकवण्याची ही ऑफर होती. माझ्याकडे त्याचे व्हिडीओ आहेत, असा दावा देशमुख यांनी केला होता. याला उत्तर देताना असे व्हिडीओ असतील तर समोर आणा असे आव्हान फडणवीसांनी दिले. परंतु, ते व्हिडीओ काही समोर येताना दिसत नाहीत. देखमुखांच्या काही व्हिडीओबाबत मात्र यानंतर चर्चा सुरू झालेली आहे. जेव्हा आरोप प्रत्यारोपांची राळ उडायला लागते तेव्हा त्यातील सत्यासत्यता तपासणे कठीण असते. देशमुखांनी आधी परमबीर यांच्यावर आरोप केले, म्हणून आता परमबीर आरोप करतायत असे म्हणायला वाव आहे. परंतु, परमबीर यांनी जे काही सांगितले आहे, त्यातल्या काही बाबी नाकारता न येणाऱ्या आहेत. पूर्वी सांगितलेल्या काही गोष्टी त्यांनी अधिक स्पष्ट केल्या आहेत.
मविआच्या काळात झालेले घपले आणि लफडी यांच्याविषयी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत परमबीर भरभरून बोलले आहेत. अनिल देशमुख ज्या आरोपांसाठी तुरुंगात गेले त्या भानगडीत ते फक्त एकटे नव्हते. ते आदेशाचे पालन करत होते. शरद पवार, उद्धव ठाकरेंना या घपल्याबाबत माहिती होती, किंबहुना त्यांचे मूक समर्थन होते, हा परमबीर यांच्या दाव्यांचा अन्वयार्थ आहे.

भानगड फक्त १०० कोटींच्या वसुलीची नाही, हा आकडा फक्त मुंबईपुरता मर्यादित होता. राज्यात झालेल्या वसुलीचा आकडा तर त्याही पेक्षा मोठा आहे, असे परमबीर म्हणाले आहेत. मुंबईत १० पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या. यामागे आर्थिक कारण असावे, असे परमबीर यांनी अधोरेखित केले. देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख हे कुंदन शिंदे यांच्यासोबत ललित या पंचतारांकीत हॉटेलात बसून वसुली करायचे. इथे व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांना बोलवायचे, असा त्यांचा आरोप आहे.
ललितचे सीसीटीव्ही फूटेज आणि नोंदी तपासल्या तर ही बाब उघड व्हायला वेळ लागणार नाही. या सगळ्या खेळाचा रिंग मास्टर वेगळाच होता, असे परमबीर इशाऱ्या इशाऱ्यात सांगतात.

देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्या बैठका शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झाल्या, असे परमबीर यांनी सांगितले. चव्हाण यांच्या कार्यालयात झालेल्या याच्या व्हिडीओ रेकॉर्डीगची ट्रान्सस्क्रीप्ट देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखवली होती. त्यात अनिल गोटे आणि चव्हाण यांचा संवाद असून अनेकदा शरद पवारांचे नाव घेण्यात आलेले आहे.

हे ही वाचा..

पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची अत्याचार करून हत्या

“मविआ काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांना सुपारी दिलेली”

आंदोलकांच्या दबावानंतर बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा

संजय राऊत हे पवारांची सोंगटी

पोलिस आयुक्त संजय पांडे, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील हे अधिकारीही भाजपा नेत्यांना गुंतवण्यात सहभागी होते, असे परमबीर म्हणतात. आयपीएस अधिकारी राजकारण्यांपेक्षा मुरलेले असतात ही बाब सत्य आहे. त्यामुळेच परमबीर यांनी पोलिसांच्या बदल्यांच्या प्रकरणात देशमुख यांच्या सह्या असलेले कागद त्यांच्याकडे सांभाळून ठेवले आहेत. अजून बरेच काही आहे, वेळ आल्यावर मी उघड करेन असा अलिकडे वारंवार वापरण्यात येणारा डायलॉगही त्यांनी हाणलेला आहे. अर्थात परमबीर सांगतायत मी फक्त शोकेस दाखवलेले आहे. गोदामात काय आहे, हे अजून शिल्लक आहे. परमबीर हे फडणवीसांचे बाहुले असल्याचा देशमुख यांचा आरोप हास्यास्पद आहे. महाराष्ट्रात सत्ता राबवणारी मविआ भाजपा नेत्यांचे बाहुले असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याला मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कशाला नेमेल? पायावर धोंडा मारून घेण्याची सुरसुरी कोण दाखवेल? परमबीर खोटे बोलतायत असे गृहीत धरले तरी त्यांनी ईडी आणि सीबीआयला दिलेल्या पुराव्यांचे काय? पुन्हा ते म्हणतायत की माझी नार्को टेस्ट करा. काही दिवसांपूर्वी मनसुख हिरेन हत्या आणि एंटालिया स्फोटक प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाजेला जेव्हा वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येत होते तेव्हा त्यानेही माझी नोर्को करा, असे मीडियाच्या कॅमेरासमोर सांगितले होते. परमबीर फक्त एक पाऊल पुढे गेले, देशमुखांच्या सोबत माझी नार्को करा असे ते म्हणाले आहेत. देशमुख यांना स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची संधी आहे.

एंटालिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरणची हत्या यात कोण सामील होते? १०० कोटी, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आदी घपले झाले की ते भाजपाच्या मनाचे श्लोक होते, झाले असतील तर त्याचे लाभार्थी कोण होते? मास्टर माईंड कोण होते, या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. कदाचित परमबीर हे खोटं बोलतायत हे ही स्पष्ट होईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा