27 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम; अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम; अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक

२००८ पासून भारताने सलग पाच ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदके जिंकली आहेत

Google News Follow

Related

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. अमनने चुरशीच्या लढतीत पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूचा १३-५ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. यानंतर आता भारताच्या खात्यात सहा पदकांची नोंद झाली आहे. अमन सेहरावतच्या पदकाने ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम ठेवली आहे. २००८ पासून भारताने सलग पाच ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदके जिंकली आहेत.

भारताच्या अमन सेहरावतने कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या फेरीत वर्चस्व राखले आणि प्रतिस्पर्ध्यावर ६-३ अशी आघाडी घेतली. यानंतर अमनने दुसऱ्या फेरीतही आपली आघाडी कायम राखली. सामन्याच्या शेवटच्या दोन मिनिटांत अमनने पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूवर ८-५ अशी आघाडी घेतली. यादरम्यान क्रुझ डॅरिएन तोई पूर्णपणे दमलेला दिसला. त्याला ब्रेकही घ्यावा लागला. शेवटचा एक मिनिट बाकी असताना अमनने १२-५ अशी आघाडी मिळवली होती. वेळ संपताच अमनने १३ गुणांसह सामना जिंकला.

अमन आशियाई चॅम्पियन राहिला असून २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताला कुस्तीमधून पदकाची अपेक्षा होती, ती अमनने पूर्ण केली आहे. याआधी विनेश फोगाटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती मात्र अतिरिक्त वजनामुळे तिला साम्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले.

हे ही वाचा :

अनिल देशमुखांच्या मागे पवार, ठाकरे !

“ऑलिम्पिक अपात्रता प्रकरणात विनेशसोबत कोणताही कट रचलेला नाही”

कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार !

दिल्ली दरबारी जाऊन, भजन, पाद्यपूजन करून चरणामृत घेऊन आले, परंतु कटोरा रिकामाच !

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम

शिवाय अमन सेहरावतच्या पदकाने ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम ठेवली आहे. २००८ पासून भारताने सलग पाच ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदके जिंकली आहेत. हॉकीनंतर भारताची सर्वाधिक आठ ऑलिम्पिक पदकं कुस्तीतून आली आहेत. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच, १९५२ मध्ये, केडी जाधवने भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले. यानंतर ५६ वर्षे भारताला कुस्तीमध्ये पदक मिळाले नाही आणि त्यानंतर सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. तेव्हापासून भारतीय कुस्तीपटू ऑलिम्पिकमध्ये सातत्याने पदके जिंकत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
206,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा