25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषरिलायन्सकडून मुंबईसाठी ८७५ नवे अद्ययावत बेड

रिलायन्सकडून मुंबईसाठी ८७५ नवे अद्ययावत बेड

Google News Follow

Related

देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. यात महाराष्ट्रात आणि खासकरुन मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. अशात कोविड पेशंटला बेडसह ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशात अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढं येऊ लागल्या आहेत. रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत ८७५ बेडस् नवे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ६००, वरळतील एनएससीआय मध्ये १००,  सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ४५ आयसीयुसह १२५ बेडस् तर ट्रायडंट, बिकेसी येथे १०० बेडस् ची नव्यानं उपलब्धता करुन देण्यात आली आहे.

माहितीनुसार, वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेली ६५० बेड्सची सुविधा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येणार आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठींच्या एकूण ६५० खाटांचे परिचलन व व्यवस्थापन करेल. याशिवाय  अधिकच्या १०० आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. १५ मेपासून हे बेड्सच उपलब्ध होतील, अशी माहिती आहे. रिलायंस फाऊंडेशनकडून ५०० हून अधिक वैद्यकीय फ्रंटलायनर्स यामध्ये डॉक्टर, नर्स, नॉन मेडिकल स्टाफ यांना सुविधांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलं आहे. आयसीयू बेड, क्वारंटाइन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, सगळ्या आरोग्य सुविधांची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशन करणार आहे.

गेल्या वर्षीसुद्धा फाउंडेशनच्या वतीने मुंबई महापालिकेला सहकार्य म्हणून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी खास २२५ बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये १०० बेड्स आणि २० आयसीयू बेड्सची जबाबदारी उचलली होती. यावर्षीही सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि एनएससीआय इथल्या कोविड सेंटरमधल्या सर्व कोविड रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत उपचार देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे. एनएससीआय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयातील सर्व कोरोना रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील.

वांद्रे-कुर्ला कॅम्प्लेक्स (बीकेसी) येथील द ट्रायडंट हॅटेलमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार किरकोळ लक्षणे असलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी १०० खाटांची सुविधा आहे. ही सुविधेचे व्यवस्थापन आता सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय करेल. एनएससीआय, सेव्हन हिल्स रुग्णालय आणि बीकेसी येथील द ट्रायडंट येथील अतिदक्षता विभागातील १४५ खाटांसह आता सर्व मिळून ८७५ खाटांचे व्यवस्थापन रिलायन्स फाऊंडेशनमार्फत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या की, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी  रिलायन्स फाउंडेशन कटिबद्ध आहे. आमचे डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्कर्स अहोरात्र राबून सेवा पुरवत आहेत. आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवून जीव वाचवण्याचं काम असंच करत राहू. मुंबईतल्या ८७५ कोविड बेड्सची व्यवस्था आम्ही पाहात आहोत. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्ये प्रदेश आणि दमण दीव, नगर हवेली इथे दररोज ७०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा फाउंडेशनच्या वतीने मोफत देण्यात येत आहेत. या संकटकाळात देशवासीय म्हणून जेवढं शक्य आहे ते आम्ही करत आहोत, असं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

मोफत लसीकरणासाठी ठाकरे सरकार पैशाचे सोंग कुठून आणणार?

काही तासांत भारतात येणार ऑक्सिजन, अमेरिकेतून विमान निघालं

व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील वादग्रस्त कृतींसाठी ऍडमिन जबाबदार नाही

‘या’ चार राज्यांमध्ये १ मेपासून तरुणांना लस नाहीच

मुंबईतील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाऊंडेशनने (आरएफ) शहरातील कोविड व्यवस्थापनाची गरज लक्षात घेत तसेच वैश्विक साथीविरुद्ध लढणाऱया शासनाला साहाय्य करण्यासाठी तिचे या क्षेत्रातील कार्य अधिक वेगवान केले आहे. महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबरचे सहकार्य अधिक वृद्धिंगत करताना मुंबईतील कोविडविरोधातील लढाईसाठी रिलायन्सने आणखी चार उपक्रम राबविले आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा