29 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषविनेश फोगाटसाठी कोणताही नियमांचा अपवाद नाही...तिला रौप्य दिले जाऊ शकत नाही...

विनेश फोगाटसाठी कोणताही नियमांचा अपवाद नाही…तिला रौप्य दिले जाऊ शकत नाही…

कुस्ती महासंघाच्या लालोविच यांनी दिले स्पष्टीकरण

Google News Follow

Related

भारताची कुस्तीगीर विनेश फोगाटला अतिरिक्त वजनामुळे ऑलिम्पिक पदकाला मुकावे लागले. त्यामागे षडयंत्र असल्याचे आरोप झाले, भारतावर ऑलिम्पिकमध्ये जाणीवपूर्वक अन्याय झाल्याचेही बोलले गेले. पण यासंदर्भात जागतिक कुस्ती संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे. जागतिक कुस्ती संघटनेचे अध्यक्ष नेनाद लालोविच यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विनेश फोगाट ही नियमांना अपवाद नाही. निराशा येणे स्वाभाविक असले तरी नियम हे नियम असतात आणि त्यासाठी कुणालाही अपवाद धरले जात नाही.

लालोविच म्हणाले की, आपण नियमांचा आदर केला पाहिजे. जे झाले त्याबद्दल मला सहानुभूती आहे पण तिचे वजन अधिक होते. हे वाढीव वजन कमी वाटत असले तरी शेवटी नियम नियमच आहेत. जेव्हा खेळाडूंचा वजन घेतले जाते तेव्हा ते सार्वजनिक असते. सगळे खेळाडू तिथे असतात. कुणालाही वजन करू न देता खेळायला दिले जाऊ शकत नाही.

विनेशला रौप्य मिळणार नाही

विनेशने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे तिला रौप्य किंवा सुवर्ण तरी मिळणारच हे निश्चित होते. अतिरिक्त वजनामुळे ती अपात्र ठरली असली तरी तिला रौप्यपदक तरी मिळायला हवे अशी लोकभावना होती. खेळाडूंकडूनही मागणी करण्यात आली की, तिला रौप्य तरी द्यावे.

हे ही वाचा:

बांग्लादेशात कम्युनिस्ट नेत्याची फासावर लटकवून हत्या !

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू !

बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्तालयातील १९० कर्मचारी मायदेशी परतले

त्याबद्दल लालोविच म्हणाले की, ते अशक्य आहे. कारण सगळे बदल होत आहेत. नियम हे नियम आहेत. जे या स्पर्धेत खेळत आहेत त्या प्रत्येकाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांदा वजन करणे अनिवार्य आहे.
१०० ग्रॅम वजनच तर जास्त झाले. त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. हे वाढीव वजन अगदी मामुली होते, या प्रश्नावर लालोविच म्हणाले की, नियमांच्या बाबतीत खूप कठोर राहावे लागते. जर १०० ग्रॅम अतिरिक्त वजन खपवून घेतले तर उद्या कुणी २०० ग्रॅमने काय होणार असाही सवाल करेल. त्याला मग काही मर्यादाच राहणार नाहीत.
लालोविच म्हणाले की, कुस्तीगीर हे आपले वजन खूप कमी करत आहेत आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. आज ते आपल्या तात्कालिन हितासाठी हे निर्णय घेतात पण २०-३० वर्षांनी त्याचे परिणाम दिसतील. खेळाडूंनी आपल्या नैसर्गिक वजनातच खेळले पाहिजे.

लालोविच यांनी सांगितले की, हे काही पहिले उदाहरण नाही. याच स्पर्धेत इटलीची कुस्तीगीर अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरली आहे. तिच्या पहिल्या सामन्याआधीच तिचे वजन ५० किलोपेक्षा अधिक होते. अल्जेरियाचा मसूद ज्युडोत अपात्र ठरला. विनेश ही मूळची ५० किलो वजनी गटातील नाही. ती ५३ किलोत खेळत असे. पण अंतिम पंघलने या गटात स्थान मिळविल्यानंतर विनेशने ५० किलो गटातून खेळण्याचा निर्णय घेतला. कुस्ती चाचणीत तिने दोन्ही गटातून खेळण्याची विनंती केली. ५३ किलो गटात ती पराभूत झाली पण ५० किलो गटात ती पात्र ठरली. तिला अर्थात वजन कमी करावे लागले आणि ते करणे सक्तीचे बनले. पण ते ठेवणे तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शक्य झाले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा