27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषउद्या तुम्ही भारत ही तुमचीच संपत्ती आहे म्हणाल! मध्य प्रदेश वक्फ बोर्डाला...

उद्या तुम्ही भारत ही तुमचीच संपत्ती आहे म्हणाल! मध्य प्रदेश वक्फ बोर्डाला सुनावले

प्राचीन वास्तूंच्या मालकीबद्दल न्यायालयाने विचारला सवाल

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील शाह शुजाचे थडगे, नादिर शहाचे थडगे आणि बिबी साहीब मशीद  बऱ्हाणपूरला असलेला राजवाडा ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा मध्य प्रदेश वक्फ बोर्डाने केल्यानंतर तो निर्णय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने रद्द ठरविला. बऱ्हाणपूरचा किल्ला हा आमची संपत्ती असल्याचा वक्फ बोर्डाचा दावा आहे. त्याववरून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी वक्फ बोर्डाला खडे बोल सुनावले.

२०१३मध्ये वक्फ बोर्डाने पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला विनंती केली होती की, हा किल्ला आमचा आहे. तेव्हा विभागाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानुसार हा ४.४४८ हेक्टरचा परिसर प्राचीन वास्तूंच्या अंतर्गत येत असल्याचे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे होते.

पुरातत्त्व विभागाने सांगितले की, अनेक दशके ही संपत्ती पुरातत्त्व विभागाची आहे. त्यामुळे ती वक्फ बोर्डाची होऊ शकत नाही. पण वक्फ बोर्ड यावर कायम होते की, ही संपत्ती आमची आहे असा आम्ही दावा केलेला आहे त्यामुळे ती आम्हाला मिळायला हवी.

हे ही वाचा:

मांडवीय म्हणाले, विनेशला ऑलिम्पिकसाठी सर्वप्रकारचे सहाय्य केले गेले!

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू !

“विनेश तू देशाची चॅम्पियन आणि अभिमान आहेस…” अपात्रतेनंतर पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन

धक्कादायक! विनेशचे १०० ग्रॅम वजन अधिक, ऑलिम्पिकमधून अपात्र

यासंदर्भात २६ जुलैच्या निकालात न्यायाधीश अहलुवालिया यांनी स्पष्ट शब्दांत वक्फ बोर्डाला सुनावले. १९०४च्या प्राचीन वास्तू सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत १९१३ व १९२५ला या वास्तू प्राचीन असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही संपत्ती या सुरक्षा कायद्यातून स्वतंत्र करण्यात आल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. उलट न्यायाधीशांनी सांगितले की, पुरातत्त्व विभागाने कर्नाटक वक्फ बोर्ड आणि भारत सरकार यांच्यातील खटल्याचा संदर्भ देत प्राचीन वास्तू या फक्त भारत सरकारच्या अखत्यारितच असतील.

अहलुवालिया वक्फ बोर्डाच्या वकिलाला म्हणाले की, ताजमहालला वक्फ बोर्डाची वास्तू म्हणून का घोषित करत नाहीत? उद्या तुम्ही म्हणाल की, सगळा भारत ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे. असे होऊ शकत नाही की तुम्ही नोटीस काढाल आणि अमूक मालमत्ता ही तुमची होऊन जाईल? वक्फ बोर्डाच्या सीईओंनी ही मालमत्ता बोर्डाची संपत्ती असल्याचे सांगणे हे बेकायदेशीर आहे. उद्या तुम्ही सरकारी कार्यालयदेखील वक्फ बोर्डाची संपत्ती आहे म्हणाल. कुणाच्याही संपत्तीला तुम्ही तुमची संपत्ती कसे काय म्हणू शकता?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा