केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधून कलम-३७० हटवून आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. कलम ३७० रद्द करून पाच वर्षे पूर्ण झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोमवारी (५ ऑगस्ट) जम्मूच्या अखनूर भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी अखनूर एलओसी परिसरात ठिकठिकाणी चौक्या उभारल्या असून सुरक्षा दल गस्त घालत आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीर पोलीस तसंच इतर सुरक्षा यंत्रणाही सतर्क आहेत. सुरक्षा दलांकडून वाहने आणि कागदपत्रांचीही कसून तपासणी केली जात आहे.
५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत कलम ३७० हटवण्यात आले होते. कलम-३७० हटवताच राज्याचा विशेष दर्जाही रद्द झाला. तसेच राज्याची दोन केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लदाख अशी विभागणी करण्यात आली. दरम्यान, कलम ३७० हटवल्याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारची घुसखोरी किंवा अन्य घटना रोखण्यासाठी शहरापासून गावापर्यंत कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
हे ही वाचा..
युद्धबंदीची चर्चा अयशस्वी, इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू !
युद्धबंदीची चर्चा अयशस्वी, इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू !
महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन पडले महागात, टीएमसी मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा !
या हिंदू द्वेष्ट्याचे उद्धव ठाकरे कान उपटणार का?
दक्षिण जम्मूचे पोलिस अधीक्षक अजय शर्मा म्हणाले की, ‘दहशतवादी कारवाया पाहता आम्ही नेहमीच सतर्क असतो. ५ ऑगस्ट असो वा १५ ऑगस्ट. आम्ही आमच्या सुरक्षा सज्जतेबद्दल सर्व काही सांगू शकत नाही. पण, आम्ही सर्वांना खात्री देऊ इच्छितो की, सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.