25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणफडणवीस ठाण मांडून बसले म्हणून नागपुरात कोरोना आटोक्यात

फडणवीस ठाण मांडून बसले म्हणून नागपुरात कोरोना आटोक्यात

Google News Follow

Related

महाविकासआघाडी सरकार राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळेच आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरावे लागत आहे, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. ठाकरे सरकार कोरोनावर मात करण्यात कमी पडत आहे. रुग्णांना बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर तर कुठे गाडीमध्ये, जमिनीवर रूग्णांना ऑक्सिजन लावण्यात येत आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करत असल्याचे दरेकर यांनी म्हटले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व विधान परीषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत दोन कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. कांदीवली येथील भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटर व नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे रविंद्र जोशी फाउंडेशन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला. या निमित्ताने दरेकर बोलत होते. दरेकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच लोकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरबद्दल आमदार योगेश सागर यांचे व सेंटरच्या उभारणीत योगदान असलेल्या सर्वांना धन्यवाद दिले.

हेही वाचा:

भारतीय जेम्स बॉण्ड, अजित डोवाल मुत्सद्देगिरीतसुद्धा भारी

मोफत लसीकरणावरून मविआमध्येच जुंपली

ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली

अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देखील मदत

नागपूर येथे कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच, देवेंद्र फडणवीस नागपूरात ठाण मांडून तेथील रूग्णसंख्या आटोक्यात आणली. नागपूरात अशी परीस्थिती असताना नागपूरबरोबरच देवेंद्रजी मुंबईतही वेळ देतात. यावेळी त्यांनी दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे झालेल्या कोविड सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमाचीही आठवण करून देत देवेंद्रजींचे आभार मानले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा