24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषवायनाडमधील आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेला धावून!

वायनाडमधील आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेला धावून!

Google News Follow

Related

केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून, वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलन झाल्याची दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून, तब्बल सुमारे ५ कि.मी. परिक्षेत्रातील ४ गावे या भूस्खलनात वाहून अथवा दरडी खाली दबून गेली आहेत. या संकटाच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदतीला धावून गेला आहे. नेहमीच नैसर्गिक आपत्ती आणि संकटकाळात आरएसएसचे स्वयंसेवक हे मदतीचा हात देत असतात.

आतापर्यंत जवळपास २५६ लोकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त असून, ४०० जण जखमी झाले आहेत, तर आणखी २५० लोक बेपत्ता असल्याचेही समोर येते आहे. मात्र अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा बराच वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

पूजा खेडकरला धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

नेमबाज स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; खाशाबा जाधवांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक !

अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात होणार वर्गीकरण

आत्मघाती बॉम्बस्फोटाचा तज्ज्ञ खालेद होणार हमासचा प्रमुख !

सेवाभारतीचे कार्यकर्ते या भागात मदत कार्यासाठी पोचले असून, आपदग्रस्त भागातील जे आपले बांधव सुदैवाने जिवंत राहिले आहेत, त्यांना अन्न वस्त्र निवारा व वैद्यकीय मदत पुरवण्यात अग्रेसर आहेत. या संकटाच्या क्षणी आपल्या बांधवांना आपल्या यथाशक्ती मदतीची आवश्यकता आहे. त्यातल्या त्यात रेनकोट्स व टेन्ट्स या दोन वस्तूंची तातडीने गरज आहे.

कृपया आर्थिक सहाय्यासाठी आपण सुरेश बाबू (मुंबई) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सेवाभारतीतर्फे करण्यात आले आहे. (आपण दिलेल्या आर्थिक मदतीसाठी आपल्याला आयकरातून सूट मिळण्याचे प्रमाणपत्र दिले जाईल).

Account Name: The Bombay Keraleeya Samaj
Account No. 002920110000660
Bank: Bank of India
Branch:Maheswari Udhyan, Matunga
IFSC: BKID0000029

या खात्यावरही पैसे जमा करता येतील. तसेच या वृत्तात असलेल्या स्कॅन कोडवरूनही आर्थिक मदत पोहोचवता येईल.

संपर्कासाठी : श्री. सुरेश बाबू
मोबाईल क्रमांक… 9594077528.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा