27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषआत्मघाती बॉम्बस्फोटाचा तज्ज्ञ खालेद होणार हमासचा प्रमुख !

आत्मघाती बॉम्बस्फोटाचा तज्ज्ञ खालेद होणार हमासचा प्रमुख !

इस्माईल हानियाच्या मृत्यूनंतर खालेदच्या नावाची चर्चा

Google News Follow

Related

हमासचा प्रमुख इस्माईल हनियाच्या मृत्यूनंतर हमासच्या प्रमुखपदी ‘खालेद मेशाल’चे नाव सर्वात पुढे आले आहे. खालेद मेशाल हा देखील तितकाच खतरनाक असल्याची माहिती आहे. दरम्यान, इस्माईल हनियाच्या मृत्यूसाठी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला जबाबदार धरण्यात येत आहे.

इस्माईल हानिया हे हमासचे राजकीय प्रमुख होते, आता त्यांच्यानंतर हमासचे ज्येष्ठ सदस्य खालेद मेशाल हे पद घेऊ शकतात. तसेच गाझा पॅलेस्टिनी भूभाग चालवणारा हमासचा आणखी एक अधिकारी ‘खलील अल-हया’ याचेही नाव शर्यतीत दिसत आहे. सध्या या शर्यतीत खालिद मेशालचे नाव आघाडीवर आहे. मेशालचा जन्म १९५६ मध्ये सिलवाड येथे झाला. वयाच्या १५ व्या वर्षी इजिप्तची सुन्नी इस्लामी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहूड’मध्ये सामील झाला.

१९८७ मध्ये हमासच्या स्थापनेत खालिद मेशालचाही सहभाग होता. खालेद मेशाल १९९२ मध्ये हमासच्या पॉलिट ब्युरोचे संस्थापक सदस्य बनला आणि १९९६ ते २०१७ पर्यंत त्याने या पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याने आपले पद सोडले आणि इस्माईल हनिया यांना त्याच पदावर नियुक्त करण्यात आले. खालिद मेशाल सध्या ६८ वर्षांचा असून परदेशात राहून त्याने बहुतांश जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

हे ही वाचा:

मुस्लिम मतांमुळे फडणवीसांवर टीका करण्यासाठी उद्धव ठाकरेंना आला जोर !

ढगफुटीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित; २०० यात्रेकरू अडकले

अभेद्य बचावात्मक खेळीसाठी ओळखले जाणारे क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन

वायनाड भूस्खलनात २५६ जणांचा मृत्यू; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता

दरम्यान, खालिद मेशाल देखील इस्माईल हनिया इतकाच खतरनाक असल्याची माहिती आहे. खालिद हा आत्मघाती बॉम्बस्फोटाचा मास्टर मानला जातो. हमासच्या स्थापनेनंतर १९९४ मध्ये हमासच्या सदस्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट सुरू केले, त्यामागे खालिद मेशालचा हात असल्याचे मानले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा