28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरदेश दुनियावर्तकनगरातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्ण दगावले

वर्तकनगरातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्ण दगावले

Google News Follow

Related

लोकांमध्ये प्रचंड संताप; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ठाण्यातील वर्तकनगर भागातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार जणांना मृत्यू झाल्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून ठाण्यात ऑक्सिजनची आणीबाणीसदृश परिस्थिती आहे, असाही आरोप आता होऊ लागला आहे. वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला. मृतदेह ताब्यात न देता पैसे भरण्याची मागणी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून केली जात असल्याचा आरोपही काही नातेवाईकांनी केला. यासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी या हॉस्पिटलमधील प्रमुख डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. वेदांत हॉस्पिटलमध्ये हा प्रकार चौथ्यांदा घडल्याचेही एका नातेवाईकाने यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांना सांगितले.

हेही वाचा:

मोफत लसीकरणावरून मविआमध्येच जुंपली

ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली

कांगावाखोरांनी रोज सकाळी कांगावा करणं बंद करावं

अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देखील मदत

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या हॉस्पिटलमधील परिस्थितीची पाहणी करून पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, या हॉस्पिटलमधील ३५ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात चार रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये ३५ आणि १२ या दोन क्रमांकांचे अतिदक्षता विभाग आहेत. त्यापैकी ३५ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात ४ मृत्यू झाले आहेत. ऑक्सिजनचा साठा कमी असेल तर मृत्यूचे प्रमाण जास्त असते. तरीही चौकशी समिती यासंदर्भात अंतिम निष्कर्ष काढेल मग निर्णय घेतला जाईल.

आव्हाड यांनी सांगितले की, भिवंडीचे आयुक्त पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली ६ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात डॉक्टर्स आणि प्रशासकीय अधिकारीही आहेत. ते या प्रकरणाची चौकशी करतील.
दरम्यान, लोकांमध्ये या घटनेनंतर प्रचंड क्षोभ आणि चीड आहे. लोकांनी आव्हाडांना घेराव घालून आपले म्हणणेही यावेळी मांडले. रुग्ण उत्तम परिस्थितीत असतानाही कसे दगावले असा सवाल नातेवाईकांनी विचारला. आमच्याकडे रुग्णालयातील रेकॉर्डिंग आहे, असा दावाही नातेवाईक करत होते. मृतदेह ताब्यात देण्याआधी सगळे पैसे भरा, अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात असली तरी आमची पैशाबद्दल कोणतीही तक्रार नाही. मात्र आमच्या रुग्णाची स्थिती चांगली असतानाही हे कसे झाले, हे कळले पाहिजे, अशा शब्दांत नातेवाईकांनी आपली कैफियत मांडली.

भरमसाठ बिले लावली जात असल्याचीही तक्रार नातेवाईक करत आहेत. त्यांची बिले कमी करून देण्याची मागणीही नातेवाईक करत होते. त्याबद्दल आव्हाड म्हणाले की, बिले कमी करून देण्यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा करून ठरवता येईल. पण ठाण्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. त्यासंदर्भात सातत्याने लक्षही ठेवले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा