30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषवायनाड भूस्खलनात २५६ जणांचा मृत्यू; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता

वायनाड भूस्खलनात २५६ जणांचा मृत्यू; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता

दुर्घटनेच्या दोन दिवसांनंतरही बचावकार्य आणि शोधकार्य सुरू

Google News Follow

Related

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतरही बचावकार्य आणि शोधकार्य सुरू असून या घटनेत आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णलायात उपचार सुरू आहेत. तर, १९० नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत, अशी माहिती आहे.

केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाःकार उडवला असून मंगळवार, ३० जुलै रोजी पहाटे वायनाडच्या मेप्पाडी या डोंगराळ भागात भूस्खलन झाल्याची घटना घडली होती. भूस्खलनाची घटना भयंकर असून घटनास्थळी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. वायनाडमध्ये नागरी संरक्षण, पोलीस, अग्निशमन विभाग, एसडीआरएफ, एनडीआरएफचे सुमारे २५० कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. तर, लष्कराच्या १२२ इन्फंट्रीचे सुमारे २२५ जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. याशिवाय येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी लष्कराकडून कोझिकोड येथे नियंत्रण कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णलायात उपचार सुरू आहेत. तर, १९० नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून घटनास्थळाचे चित्र दुखःद आहे.

हे ही वाचा:

‘वहाबी अतिरेकी दहशतवादी संघटनां’वर राष्ट्रहितासाठी बंदी घाला

वायनाड दुर्घटनेवर अमित शहा म्हणाले, ‘इशारा देऊन देखील केरळ सरकारचे दुर्लक्ष’

अमर, अकबर आणि तिसरी आघाडी…

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

या घटनेच्या पार्श्वभूमीवर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीत एकूणच परिस्थितीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने केरळच्या इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावासाची शक्यता वर्तवली आहे. या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा